Categories: Editor Choice

जल्लोष… शिक्षणाचा २०२३ ह्या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन … वाचा, काय आहे उपक्रम!

जल्लोष …शिक्षणाचा २०२३

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जानेवारी) : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक तसेच नाविण्यपूर्ण विचार वाढीकरीता विद्यार्थी व शाळा स्तरावर स्पर्धा आयोजित करणेकामी मा.आयुक्तसो. यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग व सिटी ट्रान्सफर्मेशन ऑफीस (CTO) याच्या संयुक्त आयोजनाने जल्लोष… शिक्षणाचा २०२३ ह्या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

सदर जल्लोष… शिक्षणाचा २०२३ या स्पर्धात्मक उपक्रमामध्ये तीन विविध विषयांवर उदा.शाळा स्पर्धा, विद्यार्थी स्पर्धा व तीन दिवशीय आनंदोत्सन (कार्निवल) आयोजित केला जाणार आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे

शाळा स्पर्धा –
शाळांना मूल्यमापन मापदंड पुरविले जातील.
मूल्यमापन समिती गठीत केली जाईल.
समिती प्रत्यक्ष मापदंड पडताळणी करेल.
प्रत्येक शाळांना मानांकन दिले जाईल.
प्रत्येक झोनमधून प्रत्येकी एक शाळा याप्रमाणे एकुण ८ शाळा मॉडेल शाळा ठरविल्या जातील.
मिळाणा-या बक्षिस रकमेतून २५ टक्के रक्कम विकासावर खर्च करणेस शाळेला अधिकार दिले जातील.
उर्वरित ७५ टक्के रक्कम महापालिका शाळेस मॉडेल स्कुल बनविणेकरीता खर्च करेल.
विद्यार्थी स्पर्धा (मनपा व खाजगी शाळांकरीता) –
प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी सोई व क्षमतेनुसार ५ विद्यार्थ्यांचा गट बनविणे.
प्रत्येक शाळेतून कमीत कमी ५ ते १० गट या स्पर्धामध्ये सहभागी होतील.

प्रत्येक गटास स्मार्ट सिटी, सायन्स अँड टेक्नोलॉजी, पर्यावरण, आरोग्य इत्य़ादीवर सादरीकरण व मॉडेल तयार करावे लागेल.
मुख्याध्यापक व शिक्षक प्रत्येक शाळेमधून १ किंवा २ उत्कृष्ट गटांची निवड करतील.
प्रत्येक शाळेतून निवडलेल्या उत्कृष्ट गटांची आंतरशालेय स्पर्धेकरीता नोंदणी करतील.
आंतरशालेय स्पर्धेमध्ये मनपा विद्यार्थ्यांना व खाजगी विद्यार्थ्यांना वेगवेगळी पारितोषिक दिली जातील.आनंदोत्सव (कार्निवल) –
२ दिवसीय कार्निवल (आनंदोत्सव) आयोजित केले जाईल त्यामध्ये शाळा व विद्यार्थी स्पर्धेमधील विजेत्यांचा पारितोषिक देऊन सत्कार केला जाईल.
कार्यशाळा, प्रश्नमंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थ स्टॉल्स व गेम झोन इत्यादीचे आयोजन केले जाईल.

इतर उपक्रम
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत ११० प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा कार्यरत असून त्यामध्ये जवळजवळ ५७,००० पैक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शालेय विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करीत आहे. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने आकांक्षा फौंडेशन आणि लिडरशिप फॉर स्किल एजुकेशन फौन्डेशन यांच्यासोबत करारनामा केलेला आहे. हया करारनाम्यानुसार इंग्रजी भाषा, फौंडेशनल लर्निंग आणि न्यूमरसी, मुख्याध्यापक व शिक्षक अध्यापन करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत मानधनावर शिक्षक भरती व शाळेवर लिपिक कम डेटा एन्ट्री ऑपरेटर नेमणूक करण्याची प्रक्रिया चालू आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये “ई-क्लासरूम” हा प्रकल्प राबविणेत येत असून यामध्ये अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थांना नाविन्यपूर्ण माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. सदर प्रकल्पामध्ये विज्ञान, गणित, तंत्रज्ञान, रोबोटिक्स अशा पद्धतीची आधुनिक प्रयोगशाळा विकसित केलेली आहे. तसेच डिजिटल अभ्यासक्रमाचा समावेश करून विद्यार्थांना अॅनिमेशनच्या माध्यमातून शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास होणे हे उदिष्ट आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये शहरातील गोरगरीब,कष्टकरी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील पालकांचे पाल्य बहुतांशी शिक्षण घेत आहेत. महानगरपालिकेचे नाव उंचविणेच्या दृष्टीने शाळेतील विद्यार्थांचे तसेच शिक्षकांचे गुणवत्ता मुल्यांकन करणेकामी भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) हया केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्थेची नेमणूक करण्याबाबतची प्रक्रिया करण्यात आलेली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या शाळेतील मुख्याधापक आणि शिक्षकांसाठी “क्षमता विकास प्रशिक्षण” शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उपक्रमात विज्ञान, गणित, इंग्रजी, समाज शिक्षण, पर्यावरण हया विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत असून त्याचा उपयोग मनपा शाळेतील विद्यार्थांच्या गुणवत्तावाढीसाठी उपयुक्त होणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थांना शाळेची आवड निर्माण करण्याकरिता सर्व शाळांतील इमारतींना त्याचबरोबर वर्गखोल्या, कार्यालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, मुला- मुलींचे शौचालय तसेच फर्निचर यामध्ये एकसूत्रता येणेकरिता एकाच प्रकारचे, एकाच आकारमानाचे व एकाच रंगसंगतीचे रंग देऊन मनपाच्या शाळा देशात अग्रेसर होण्याच्या दृष्टीने शाळांना स्वतंत्र बोधचिन्ह (लोगो), घोषवाक्य, नाव व एकसारखे दिशादर्शक चिन्ह देऊन शाळांना आकर्षित करीत आहोत.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे …. प्रकल्प अहवालाचे सादरीकरण

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रस्तावित…

9 hours ago

प्रेक्षकांची मने जिंकणारी हरहुन्नरी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन

'महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31ऑगस्ट  :- या सुखानो या' म्हणत टेलिव्हिजनच्या पडद्यावर झळकलेली आणि आपल्या अभिनय…

2 days ago

आझाद मैदानात पोलीस छावणी, हजारो पोलिसांचा बंदोबस्त… मराठा आंदोलनकर्त्यांचा आझाद मैदानात ठिय्या

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.28ऑगस्ट :-- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंंदोलक…

4 days ago

पिंपळे गुरव येथे श्री गजानन महाराज यांची ११५ वी पुण्यतिथी व ऋषी पंचमी उत्साहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.28 ऑगस्ट : पिंपळे गुरव येथील श्री गजानन महाराज यांची ११५ वी…

4 days ago

२५० बेड क्षमतेसह पिंपरी चिंचवड मनपाचे तालेरा रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज!

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २७ ऑगस्ट २०२५:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना सक्षम आणि…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध ठिकाणी कृत्रिम जलकुंडाची सोय

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी : दि. २६ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून…

7 days ago