Categories: Editor Choice

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भंडारा डोंगरावर होणाऱ्या संत तुकाराम महाराज मंदिरास .… दीड कोटी रुपयांच्या देणगीसह अनोखी श्रद्धांजली

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जानेवारी २०२३) : आज दि.१२ जानेवारी रोजी दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांचा दशक्रिया विधी पिंपळे गुरव येथे संपन्न झाला. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट पंढरपूर चे अध्यक्ष सद्गुरू श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांची प्रवचन रुपी सेवा होती, यात महाराजांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली, त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी समाजसेवेचे अविरत कार्य करीताना आपल्या धर्मासाठी खूप मोठी दानधर्माची सेवाही केली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भंडारा डोंगरावर होणाऱ्या संत तुकाराम महाराज मंदिरास दीड कोटी रुपयांच्या देणगीसह अनोखी श्रद्धांजली त्यांचे नातेवाईक व त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा मित्र परिवाराच्या वतीने वाहण्यात आली, याप्रसंगी दीड कोटी रुपये भाऊंच्या स्मरणार्थ भंडारा डोंगर येथे होणाऱ्या मंदिरासाठी विजय जगताप, शंकर जगताप, त्यांच्या भगिनी, नातेवाईक, कार्यकर्ते, नगरसेवक यांनी अध्यक्ष बाळासाहेब काशीद देहू, आळंदी संस्थान यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले, आणि अजूनही मदतीचा  ओघ सुरूच आहे …

आज यावेळी उपस्थित असलेल्या जनसागरावरून त्यांच्यावर जनतेचे, गोरगरिबांविषयी असणारे प्रेम दिसून येत होते. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट पंढरपूर चे अध्यक्ष सद्गुरू श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर, नगरसेवक शशिकांत कदम, आमदार महेशदादा लांडगे, माजी आमदार बाळा भेगडे, शहर संघ चालक विनोदजी बन्सल, दादा वेदक, आमदार सुनील टिंगरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय जगताप, ह भ प आचार्य रामकृष्णदास लहवितकर महाराज, ह भ प पंकज महाराज गावडे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी आमदार विलास लांडे यांनी ऋण व्यक्त केले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे यावेळी दिसत होते.

स्वतःच्या मृत्यूची कल्पना असतानाही जनतेची सेवा करणारा ‘लक्ष्मण’ मी अनुभवला ….

ह भ प पंकज महाराज गावडे

नात्याच्या पलीकडे मैत्री जपणारा एक विकासपुरुष हरपला, तीन पिढ्यांचे नाते असणारे हे आमचे घर, अनेक सहकाऱ्याना मोठं करणारा हा लक्ष्मणभाऊ , सामाजिक चळवळ उभे करणारा भाऊ … शब्दाची किंमत ठेवणारे आणि देणारे भाऊ … त्यांचे हे कार्य अविरतपणे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल

विलास लांडे (माजी आमदार)

 

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

15 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

22 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago