Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे, सांगवी-नवी सांगवीत वाढले डेंग्यूचे रुग्ण … दोन आठवडे झाले धुरीकरण यंत्रणा ठप्प!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २४ ऑगस्ट) : ऊन, पाऊस आणि साठलेल्या पाण्यामुळे शहरात डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. महिनाभरात पिंपरी चिंचवड शहरात अनेक जणांना मलेरिया; तर काही जणांना डेंगीची लागण झाली आहे. शिवाय महापालिकेच्या दवाखान्यात आणि रुग्णालयात मलेरियाचे संशयित रुग्ण आढळून आले असल्याचे दिसत आहे, तरीही पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभाग सतर्क झाल्याचे दिसत नाही.

ऊन-पावसाचा खेळ सध्या सुर असल्याने वातावरणादेखील विविध बदल होत आहेत. या वातावरणात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याने शहरातील गटारे, पदपथांवर साठलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. काही दिवसांपासून शहरात तापाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली असून खाजगी रुग्णालयात सर्दी, खोकल्याचे रुग्णदेखील मोठ्या संख्येने आढळत आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेकडून कीटकनाशक फवारणी आणि इतर उपाययोजना केल्या जात आहेत, परंतु वाढणाऱ्या रुग्णसंखे पुढे त्या तुटपुंज्या ठरत आहेत.

डासांची पैदास रोखण्यासाठी प्रयत्न महापालिकेकडून यापूर्वी डासांसाठी धुरीकरण केले जात होते; परंतु महापालिकेने जुलै महिन्याच्या सुरवातीला सर्वच आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या काहीजण बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू झाले, तर काही भागाला अजूनही अधिकारी मिळाले नाहीत. महानगरपालिकेच्या या कारभाराचा समान्य नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नवी सांगवीला अजूनही आरोग्य निरीक्षक अधिकारी मिळाला नसल्याने पूर्वी असलेल्या अधिकाऱ्यांकडे धुरीकरण करणारे मशीनला (फोगिंग मशीन ) लागणारे औषध व डिझेल भरण्यासाठी लागणारे कार्ड आहे, त्यांची बदली झाली आता नवीन अधिकारी आणि त्यासाठी आवश्यक असणारे कार्ड ( बँकेत पैसे जमा होणारे कार्ड ) मिळेपर्यंत थांबावे लागणार, यामुळे गेले दोन आठवडे झाले नवी सांगवी सांगवी परिसरात धुरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे डांसाची पैदास वाढत चालली असून महानगरपालिकेच्या या भोंगळ कारभारात नागरिकांचा बळी जाणार हे नक्की, याला जबाबदार कोण ? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

मनपाने साठलेल्या पाण्यावर औषध टाकून तेलाचा तवंग तयार होऊन पाण्यातील आळ्यांवर नियंत्रण येत असल्याने डांसाची पैदास थांबणार आहे. यासाठी महापालिकेने बांधकामाची ठिकाणे, मोठे नाले अशा ठिकाणी साठलेल्या पाण्याच्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यामुळे काही दिवसांपासून शहरात तापाच्या रुग्णांमध्ये कमालीची झालेली वाढ थांबून सर्दी, खोकल्याचे रुग्णदेखील कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago