कोविड-१९ च्या वाढत्या प्रभावामुळे पिंपरी चिंचवड शहरात १ मार्च पासून होणार हे बदल … वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२८फेब्रुवारी ) :  कोवीड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगानेपिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविदयालये यांचे नियमित वर्ग तसेच सर्व खाजगी शिकवणी वर्ग दि.१ मार्च २०२१ ते दि. १४ मार्च २०२१ पर्यंत बंद ठेवण्याबाबतचा आदेश आज आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केला आहे. मात्र  या आदेशाद्वारे ऑनलाईन शिक्षणास मुभा देण्यात आली आहे.

साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काही काळनिर्बंध आवश्यक असल्याने  हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण अथवा सेवा वगळता  दि.१ मार्च २०२१ पासून रात्री ११ ते सकाळी ६ यावेळेत संचार करण्यास प्रतिबंध असेल. मात्र दुध, भाजीपाला, फळे आदी जीवनावश्यक वस्तूंचा  पुरवठा करणा-यांना, वृत्तपत्र सेवा आणि अत्यावश्यक सेवा पुरवणा-या आस्थापना व व्यक्तींना तसेच त्यांच्या वाहनांना या आदेशामधून वगळण्यात आले आहे. तसेच ज्या उद्योगांचे शिफ्टमध्ये कामकाज चालते अशा संबंधित आस्थापनेवरील कर्मचा-यांना आणि त्यांची ने-आण करणा-या वाहनांना देखील या  आदेशामधून वगळण्यात आले आहे. तथापि वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा यांना या निर्णयातून यापूर्वी दिलेली सवलत कायम असल्याचेही आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.


कोरोना प्रतिबंधक  उपाययोजने अंतर्गत शासन तसेच महापालिकेने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश तथा मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत.
सदर आदेशाचा कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी भंग अथवा उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग कायदा,१८९७ आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व कायद्यातील इतर नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ पासून तात्काळ लागू करण्यात येत असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago