Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड मधील डॉ . आदित्य पतकराव ठरले सर्वाधिक कर देणारे दंत चिकित्सक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ सप्टेंबर) : पिपंरी चिंचवड मधील नवी सांगवी- पिंपळे गुरव येथील प्रसिद्ध दंत चिकित्सक(डेंटिस्ट) आदित्य डेंटल अ‍ॅड अ‍ॅडव्हान्स इनप्लांट सेंटरचे संचालक डॉ. आदित्य पतकराव यांची सर्वाधिक कर देणारे दंत चिकित्सक म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन येथे नोंद झाली आहे. याबद्दल मध्यप्रदेशातील उज्जैन येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले, गायक उदित नारायणन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित त्यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. आदित्य यांना यापूर्वीदेखील अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. डेंटिस्ट कॅटेगरीमध्ये सर्वाधिक कर भरणारे डॉक्टर ठरलेल्या डॉ. आदित्य यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड ,पुणेसह संपूर्ण राज्यभरातील मान्यवर व नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

दरम्यान यापूर्वी केवळ पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती. त्यानंतर डॉक्टर आदित्य यांची निवड झाली आहे.त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामधून वेगवेगळ्या क्षेत्रातील या दोन मान्यवरांची वर्ल्ड रेकॉर्ड लंडन येथे नोंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराचा नावलौकिक झाला आहे. यापूर्वी डॉक्टर आदित्य यांना लंडन पार्लमेंटचा अत्यंत सन्मानाचा समजला जाणारा “जागतिक एक्स्लन्स पुरस्कार २०१९” हा पुरस्कार मेंबर अॉफ ब्रिटिश पार्लमेंट यांच्या हस्ते लंडन पार्लमेंट हाऊस प्रदान करण्यात आला होता. तसेच राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देखील वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

डॉ.आदित्य पतकराव हे मूळचे अंबाजोगाई, बीड येथील रहिवासी असून औरंगाबाद येथील शासकीय दंत महाविद्यालयातुन त्यांनी बी.डीएस. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी नवी सांगवी येथे “आदित्य डेंटल अँड इनप्लांट सेंटर”च्या माध्यमातुन दंतचिकित्सा आणि रुग्णसेवा सुरु केली. आपल्या या सेंटरमधुन डॉ.आदित्य यहे जागतिक पातळीवरील सर्व आत्याधुनिक रुग्ण सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत . दंतरोग चिकित्सा क्षेत्रात डॉ. आदित्य यांनी आपले ज्ञान आधिक अद्ययावत (अपग्रेड) करुन दंत रुग्णांना अत्याधुनिक रुग्णसेवा प्रभावीपणे पुरवली.

एवढेच नव्हे तर दंत चिकित्सेमधील नवनवीन शोधप्रबंध तयार करून त्याचे जागतिक पातळीवरील विविध देशात आयोजित करण्यात आलेल्या दंत चिकित्सा परीषदेत वाचनही केलेले आहे. डॉक्टर पतकराव हे उपभोक्ता उत्थान संघटनेचे शहराध्यक्ष म्हणूनदेखील कार्यरत असून नुकतीच त्यांची भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाच्या राष्ट्रीय युवक कार्याध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या निवडीबद्दल डॉक्टर आदित्य पतकराव यांचे अभिनंदन केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

6 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago