Categories: Uncategorized

चिखली मध्ये माणसे मरायची वाट बघता का ? … चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील सोसायट्यांना मैलामिश्रित दूषित पाणी … नागरिक संतप्त!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४ ऑगस्ट) : चिंचवड महानगरपालिका, हद्दीतील- चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील सोसायट्यांना ड्नेज लाईनचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईनमधे मिक्स होऊन मैलामिश्रित दूषित पाणी येत असल्याने जलजन्य आजार पसरल्याबाबत परिसरातील नागरिक तक्रार करत आहेत.

चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील अभंग विश्व फेज-1,अभंग विश्व फेज-2,मिरा ऑर्किड, भागीरथी ग्लोरिया ,गवारे अंगण या सर्व सोसायट्यांमधे मैलामिश्रित पाणी येत असल्याने .या सर्व सोसायट्यांमधील लहान मुले,महिला,वयोवृद्ध नागरिक हे जुलाब ,उलट्या यासारख्या आजाराने त्रस्त आहेत. या भागामध्ये जाणारी ड्रेनेज लाईन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पाण्याची लाईन एकावरून एक जात असल्याने ड्रेनेज लाईनचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईन मध्ये मिक्स होत आहे.

ही अतिशय गंभीर बाब असल्याने संजीवन सांगळे ,अध्यक्ष ,चिखली-मोशी -पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन च्या वतीने शेखर सिंह, आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांना निवेदन देण्यात आले आहे, त्यात म्हटले आहे की,  या परिसरातील सोसायटी धारकांच्या वतीने आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री टकले. तसेच ड्रेनेज विभागाचे अधिकारी यांना देखील ही बाब कळविलेली असताना देखील यावर या दोन्ही विभागाकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही. या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या परिसरातील ४००० नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.

तरी महोदय आपणाला विनंती आहे की, कृपया लवकरात लवकर हे ड्रेनेजचे मिक्स होणारे पाणी शोधून काढावे. जोपर्यंत हे मिक्स होणारे पाणी सापडत नाही तोपर्यंत आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून या भागातील सोसायटी धारकांना टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येऊन. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ही विनंती.
तसेच आपल्या मनपा कडून या ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकताना त्या कोणताही विचार न करता टाकलेले आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये सतत हे मैला मिश्रित पाणी येण्याचे प्रकार घडत आहेत. तरी कृपया ह्या दोन्ही लाईन चेक करून त्या परत व्यवस्थित टाकून नागरिकांना व्यवस्थित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा ही विनंती.

प्रतिक्रिया
चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील या सहा सोसायट्यांमधे मागील पंधरा दिवसापासून मैला मिश्रित दूषित पाणी येत आहे. याबाबत मी स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. टकले यांना बोलून या घाण पाण्याचे फोटो देखील पाठवले होते. परंतु श्री. टकले यांनी यावर काहीही ॲक्शन घेतली नाही. यामधून महानगरपालिकेच्या प्रशासनाने नागरिकांकडून फक्त करवसुली करून घेण्याचे काम चालू ठेवलेले आहे असे दिसते. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याचे काम हे देखील महानगरपालिकेचे असते हे महानगरपालिकेचे प्रशासन विसरले आहे. हे मिक्स होणारे दूषित पाणी लवकर शोधून काढून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केला नाही , तर आमच्या फेडरेशन मार्फत हेच मैला मिश्रित पाणी घेऊन जाऊन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पिण्यासाठी दिले जाईल.त्यांना पाजले जाईल.

संजीवन सांगळे ,अध्यक्ष ,चिखली-मोशी -पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन

Maharashtra14 News

Recent Posts

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन …. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपक्रम

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन  - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…

2 days ago

एकाच तिकीटावर मुंबईकरांना सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरता येणार’

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…

4 days ago

महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा झाला सैन्यदलात लेफ्टनंट…* *आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते नवनियुक्त लेफ्टनंट शिवराज मोरे यांचा सन्मान..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…

2 weeks ago

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शाम जगताप यांच्या वतीने … पिंपळे गुरव परिसरात २० हजार नागरिकांना दिनदर्शिका वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…

3 weeks ago

स्वच्छतेमुळेच पेशंट बरे होण्यास मदत होते – नवनिर्वाचित आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालयास भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…

3 weeks ago