महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४ ऑगस्ट) : चिंचवड महानगरपालिका, हद्दीतील- चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील सोसायट्यांना ड्नेज लाईनचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईनमधे मिक्स होऊन मैलामिश्रित दूषित पाणी येत असल्याने जलजन्य आजार पसरल्याबाबत परिसरातील नागरिक तक्रार करत आहेत.
चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील अभंग विश्व फेज-1,अभंग विश्व फेज-2,मिरा ऑर्किड, भागीरथी ग्लोरिया ,गवारे अंगण या सर्व सोसायट्यांमधे मैलामिश्रित पाणी येत असल्याने .या सर्व सोसायट्यांमधील लहान मुले,महिला,वयोवृद्ध नागरिक हे जुलाब ,उलट्या यासारख्या आजाराने त्रस्त आहेत. या भागामध्ये जाणारी ड्रेनेज लाईन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पाण्याची लाईन एकावरून एक जात असल्याने ड्रेनेज लाईनचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईन मध्ये मिक्स होत आहे.
ही अतिशय गंभीर बाब असल्याने संजीवन सांगळे ,अध्यक्ष ,चिखली-मोशी -पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन च्या वतीने शेखर सिंह, आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांना निवेदन देण्यात आले आहे, त्यात म्हटले आहे की, या परिसरातील सोसायटी धारकांच्या वतीने आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री टकले. तसेच ड्रेनेज विभागाचे अधिकारी यांना देखील ही बाब कळविलेली असताना देखील यावर या दोन्ही विभागाकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही. या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या परिसरातील ४००० नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
तरी महोदय आपणाला विनंती आहे की, कृपया लवकरात लवकर हे ड्रेनेजचे मिक्स होणारे पाणी शोधून काढावे. जोपर्यंत हे मिक्स होणारे पाणी सापडत नाही तोपर्यंत आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून या भागातील सोसायटी धारकांना टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येऊन. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ही विनंती.
तसेच आपल्या मनपा कडून या ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकताना त्या कोणताही विचार न करता टाकलेले आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये सतत हे मैला मिश्रित पाणी येण्याचे प्रकार घडत आहेत. तरी कृपया ह्या दोन्ही लाईन चेक करून त्या परत व्यवस्थित टाकून नागरिकांना व्यवस्थित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा ही विनंती.
प्रतिक्रिया –
चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील या सहा सोसायट्यांमधे मागील पंधरा दिवसापासून मैला मिश्रित दूषित पाणी येत आहे. याबाबत मी स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. टकले यांना बोलून या घाण पाण्याचे फोटो देखील पाठवले होते. परंतु श्री. टकले यांनी यावर काहीही ॲक्शन घेतली नाही. यामधून महानगरपालिकेच्या प्रशासनाने नागरिकांकडून फक्त करवसुली करून घेण्याचे काम चालू ठेवलेले आहे असे दिसते. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याचे काम हे देखील महानगरपालिकेचे असते हे महानगरपालिकेचे प्रशासन विसरले आहे. हे मिक्स होणारे दूषित पाणी लवकर शोधून काढून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केला नाही , तर आमच्या फेडरेशन मार्फत हेच मैला मिश्रित पाणी घेऊन जाऊन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पिण्यासाठी दिले जाईल.त्यांना पाजले जाईल.
संजीवन सांगळे ,अध्यक्ष ,चिखली-मोशी -पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन