महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : मराठीत नेहमीच नवनवीन विषयांवर आधारीत चित्रपटांची निर्मिती केली जाते. आशयघन कथानकाला कसदार अभिनयाची जोड देत दर्जेदार निर्मिती करणं हे जणू आज मराठी सिनेमांचं समीकरणच बनलं आहे. याच समीकरणाला साजेसा असलेला आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅंगो जेडी असं शीर्षक असलेल्या या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलं आहे.
फिल्म मिल प्रा.लि.प्रॉडक्शन्स या बॅनरखाली रोहित भागवत आणि हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एखाद्या सुरेख चित्राप्रमाणं भासावं असं जॅंगो जेडीचं लक्ष वेधून घेणारं मनमोहक पहिलं पोस्टर रसिकांच्या भेटीला आलं आहे. मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर नायक आणि नायिकेची रोमँटिक जोडी पोस्टरवर पहायला मिळते. या सिनेमात एक प्रेमकहाणी पहायला मिळणार असल्याचेही संकेत या पोस्टरवरून मिळतात. चित्रपटाचं शीर्षक जॅंगो जेडी असं का ठेवण्यात आलंय? याचं उत्तर पोस्टरमध्ये नसलं तरी चित्रपटात नक्कीच मिळणार आहे. प्रेमकथेच्या अनुषंगानं इतरही काही विषयांना या चित्रपटात स्पर्श करण्यात येणार असल्याचा अंदाजही शीर्षकावरून येतो. पोस्टर मधली ‘तुमच्यातला नायक’ ही टॅग लाइन दर्शवते की ही सर्वसामान्य तरुणाची नायक बनण्याची गोष्ट आहे.
हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाचं अतिशय अभ्यासपूर्ण दिग्दर्शन केलं असल्यानं काहीशी नावीन्यपूर्ण गोष्ट जॅंगो जेडी मध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपटात गौरी नलावडे, अभिनव सावंत सोबत आदित्य आंब्रे, योगेश सोमण, डॉ. निखिल राजेशिर्के, वरुण पनवार इ.कलाकारांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.
दिग्दर्शक हरदीप सचदेव यांनी यापूर्वी ‘लगान’ आणि ‘दिल चाहता है’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये परिणामकारक योगदान दिले असल्याने, जॅंगो जेडी या चित्रपटकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…