मराठवाडा जनविकास संघातर्फे सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी … निराधार , दिव्यांग , सफाई , कामगार , पोस्टमनला दिवाळीनिमित्त कपडे व मिठाई भेट!

महाराष्ट्र 14 न्यूज : दिवाळी सण हा गरीब-श्रीमंत, लहान-थोर, कामगार-मालक अशा सर्वांना सुखावून जाणारा आनंदाची पर्वणी देणारा असतो. पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाने यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी साध्या पद्धतीने, परंतु सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विभिन्न घटकांसोबत साजरी करण्याचे ठरविले आहे. समाजातील श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अशा कामगारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची दिवाळी, नंतर पाहू आपली’ या भूमिकेतून निराधार मुले मुली, दिव्यांग व्यक्ती, सफाई कर्मचारी, पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, औषध फवारणी करणारे कामगार आदींना पोशाख व मिठाई वाटप करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने ‘स्नेहछाया निराधार बालगृह’ दिघी येथील विद्यार्थी – विद्यार्थीनी, ‘दिव्यांग प्रतिष्ठान’ चिंचवड येथील दिव्यांग व्यक्ती, पिंपळे गुरव ‘पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी व पोस्टमन, पिंपरी ‘पोस्ट ऑफिस’ मधील पोस्टमन – कर्मचारी, पिंपरी – चिंचवडसह भोसरी भागातील महिला व पुरुष सफाई कामगार, घंटागाडी कामगार, औषध फवारणी करणारे कामगार, महापालिकेचे महिला कामगार यांना फराळ आणि साडी चोळी, तसेच पुरुष कामगार वर्गाला पुर्ण पोशाख व मिठाई देऊन दिवाळी आधीच दिवाळी साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून आयोजित करण्यात आला होता. यावेळी लहानग्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. विक्रम महाराज जाधव, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक विकास संघ दिघीचे संस्थापक अध्यक्ष सुभेदार मेजर (निवृत्त) अशोकराव काशीद, दिघीकर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. उत्तम घुगे, सांगवी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सोळुंके, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, अलका जोशी, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या निर्मलाताई गायकवाड, माजी नगरसेवक चंद्रकांत भाऊ वाळके, सामाजिक कार्यकर्ते कुलदिप परांडे, सूर्यकांत कुरुलकर बळी राम माळी अनिसभाई पठाण प्रकाश इंगोले संतोष पाटील रमेश जाधव ह, भ, प, राजु मोरे , मराठवाडा जनविकास संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका जोशी यांनी, तर दत्तात्रय धोंडगे यांनी आभार मानले.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago