Google Ad
Editor Choice

संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त हस्तलिखित एकनाथी भागवत ग्रंथाचे वाटप

संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त हस्तलिखित एकनाथी भागवत ग्रंथाचे वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०२ जानेवारी) : पिंपळे गुरव येथील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हस्तलिखित एकनाथी भागवत ग्रंथाचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रंथ फॉर्म भरून हस्तलिखित करण्यासाठी ग्रंथाचे हस्तांतरण महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदायाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजयअण्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

Google Ad

यावेळी सेंद्रिय शेतीतज्ज्ञ  दिलीपराव देशमुख बारडकर, सुर्यकांत कुरुलकर , मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, वामन भरगंडे, सूर्यकांत कुरुलकर, प्रल्हाद झरांडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके, उपाध्यक्ष सुनील शिंदे, कार्याध्यक्ष पोपट चव्हाण, सचिव शिवाजी भोईर, कोषाध्यक्ष सुभाष बिनायक्या आदी मान्यवर उपस्थित होते.

आळंदीत ज्ञानेश्वरी लेखी पारायण सांगता सोहळ्यात ह. भ.प. संतोष महाराज पायगुडे आणि शेखर महाराज जांभुळकर यांनी भागवत लिखाणांचे आव्हान केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्रभरातून भाविकांचा मोठा सहभाग नोंदवला जात आहे. 1008 प्रति हस्तलिखित एकनाथी भागवत लेखी करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभाग नोंदवला आहे.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!