Google Ad
Editor Choice

पिंपरी-चिंचवड ते पुणे अंतर गाठा फक्त 30 मिनिटांत, ट्रायल रन यशस्वी; ‘हे’ आहेत 10 स्टेशन्स, पहा संपूर्ण Route Map.

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जानेवारी) : पुणे मेट्रोने फुगेवाडी (पिंपरी – चिंचवड मनपा हद्द) ते सिव्हिल कोर्ट (पुणे मनपा हद्द) आणि सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) ते वनाझ (उन्नत स्थानक) या मार्गिकांवर ट्रायल रन घेतली. पुणे मेट्रोमध्ये पिंपरी – चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (17Km) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (16 Km) असे 33Km लांबीचे दोन मार्ग आहेत.

पुणे मेट्रोचे 85% काम पूर्ण झाले असून उर्वरित 21Km मार्गाची कामे जोमाने सुरू आहेत. काही महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होऊन ते प्रवाशांसाठी खुले करण्यात येतील.

Google Ad

नुकतेच पुणे मेट्रोने गरवारे कॉलेज स्थानक ते सिकिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि रेंजहिल स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक अशा चाचण्या पूर्ण केल्या.

मेट्रोने फुगेवाडी स्थानक येथून मेट्रो ट्रेनची चाचणी सकाळी 10.30 वाजता सुरू केली. दापोडी स्थानक, बोपोडी स्थानक, खड़की स्थानक, रेंजहिल स्थानक आणि शिवाजीनगर स्थानक अशी स्थानके पार, करून मेट्रो ट्रेन 11.15 वा. सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक येथे पोहोचली. या चाचणीसाठी 45 मिनिटे वेळ लागला.

तसेच, दूसरी चाचणी सकाळी 11.20 मिनिटांनी सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) येथून सुरू झाली आणि बनाझ (उन्नत स्थानक) येथे 11.45 वा. पूर्ण झाली या चाचणीसाठी 25 मिनिटे वेळ लागला.

या दोन्ही चाचण्या नियोजित उद्दिष्टानुसार पार पडल्या. एकूण 15 किमी (फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) ते वनाझ 8 किमी आणि (उन्नत स्थानक – 7 किमी) मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!