Categories: Uncategorized

कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी बद्दल … दिग्दर्शक रामकुमार शेडगे विशेष पुरस्कार देऊन सन्मानित

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ नोव्हेंबर) : कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांना ‘कला परिवार हडपसर’ या संस्थेकडून गौरविण्यात आहे. कोरोनाच्या काळात सामन्य, गरजू आणि गरीब लोकांपर्यत शिजवलेले अन्न, धान्यकीट, औषधे, मास्क, सॅनिटायझर आणि आर्थिक मदत केल्याबद्दल रामकुमार शेडगे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन आणि कुंडीतील रोप देऊन त्यांचा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामहामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांचे हस्ते गौरव करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना भोसले म्हणाले कि कोरानाच्या काळात समाजाची आणि आर्थिक घडी विस्कटली होती. अशा परिस्थितीमध्ये रामकुमार शेडगे यांनी सामान्य, गरजू, लोकांना केलेली मदत हे प्रशंसनीय आहे. शेडगे यांनी चित्रपट महामहामंडळाचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून देखील अनेक वर्ष काम पाहिले.

रामकुमार शेडगे म्हणाले कि कोरोना व लॉकडाऊनमध्ये समाजाची अवस्था दयनीय होती. रिकाम्या हाताला काम आणि रिकाम्या पोटाला अन्नाची भ्रांत होती. कडक संचारबंदी असल्याने हातावर पोट असणाऱ्या तसेच रस्त्यावर, मंदिरांच्या बाजूला भिक्षेवर उदर निर्वाह करणाऱ्या गरीब, गरजू, सामन्य जनते पर्यंत आम्ही मदत पोहचवली.

यावेळी कला परिवार हडपसर कडून मोहम्मद शेख यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कै. ऍड. गणेश कदम स्मृती पुरस्कार गायक जगन बुलाखे, कै. हसीना मंडल पुरस्कार मेकअप आर्टिस्ट अब्दुल सय्यद, अल्लेखनीय कामगिरी ऍड. लक्ष्मी ताई माने, विद्या लाटे कांबळे, व बच्चू सिंग टाक यांचाही सन्मान तर उल्लेखनीय कामगिरी तसेच विशेष पुरस्कार देऊन रामकुमार शेडगे यांचा गौरव करण्यात आला.

संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमात नेहमी सहकार्य करणारे दत्ता दळवी, सोमनाथ तांबे, रामदास भाऊ तुपे, महेश ससाणे ,दत्तात्रय चोरघे, महेश सुतार, अकिल राजपूत यांचाही सन्मान केला. यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, समद खान, प्रकाश धिंडले, सोमनाथ तांबे, दत्ता दळवी, नीताताई भोसले, रोहिणी ताई भोसले या मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मानपत्राचे वाचन कला परिवार हडपसर चे अध्यक्ष दिलीप मोरे यांनी केले.

प्रमोद अय्या,रफिक मणियार, रऊफ शेख, अजय खंडागळे ,सतीश कालेकर, नंदू जगताप, व्हि.जी. पाटील ,अकिल राजपूत, श्रुतिका क्षिरसागर, रेणू पुणेकर ,राजश्री कदम, जयश्री चव्हाण, उर्मिला कावडे, मिराताई शिंदे,अलका गायकवाड, पारुल शहा या गायक-गायिकांनी मंत्रमुग्ध करणारी गाणी सादर करून रसिकांचे मनोरंजन केले.

आकाश जाधव ,महेश सुतार , सचिन गोसावी , प्रथमेश कांबळे ,सचिन कुंभार ,गणेश गोंजारे ,जयश्री टिकारे , दीपा वांबुरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago