धर्मवीर संभाजी महाराज उद्यानाचे होणार नूतनीकरण … नगरसेवक ‘बाबासाहेब त्रिभुवन’ यांनी केली उद्यानाची पाहणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी येथील महापालिकेच्या धर्मवीर संभाजी महाराज उद्यानाचे लवकरच नूतनीकरण व सुशोभीकरण होणार असून या सुशोभीकरणामुळे उद्यानाचे रुपडे पालटण्यास हातभार लागणार आहे.

‘ग’ प्रभाग अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक बाबसाहेब त्रिभुवन यांनी सोमवारी सहाय्यक आयुक्त व ग प्रभाग क्षेत्रीय आधिकारी श्रीनिवास दांगट यांच्यासमवेत या उद्यानास भेट दिली. व उद्यानात होत असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, सहाय्यक उद्यान आधिक्षक जयदेव पटेल आदींसह उद्यान व स्थापत्य विभागाचे अन्य आधिकारी उपस्थित होते. यावेळी त्रिभुवन यांनी उद्यान अधिकार्‍यांशी चर्चा करून उद्यानामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार्‍या विविध सोयीसुविधांची माहिती घेतली.

उद्यानात जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विरंगुळा केंद्राचीही पाहणी करून या विरंगुळा केंद्राची नियमित देखभाल करण्याच्या सुचना दिल्या. लहान मुलांसाठी असलेली खेळणी चांगल्या स्थितीत आहेत का याची शहानिशा करून नादुरुस्त खेळण्यांची दूरस्ती करण्याबाबतचे आदेशही त्रिभुवन यांनी यावेळी दिले. या परिसरता उद्यानात बनविण्यात येणार्‍या बॅडमिंटन खेळासाठीच्या सिंथेटिक कोर्ट तसेच अन्य नूतनीकरणाची कामे वेळेवर वेळेवर पूर्ण करण्यात येणार असून सुशोभीकरणामुळे उद्यानाच्या सौंदयात नक्की भर पडेल अशी प्रतिक्रिया नगरसेवक त्रिभुवन यांनी व्यक्त केली.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago