Google Ad
Uncategorized

घटस्फोटीत, विधवा, विधुर यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद फुलवत … देवांग कोष्टी समाज पुणे आयोजित ४ था पुनर्विवाह वधु वर मेळावा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : देवांग कोष्टी समाज पुणे आयोजित 4 था पुनर्विवाह वधु वर मेळावा दिनांक 01 मे 2023 रोजी पिंपळे निळख येथे उत्साहात पार पडला. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने देवांग कोष्टी समाज नेहमी विधायक कार्य करत असतो, या कार्याचा एक भाग घटस्फोटीत, विधवा, विधुर यांना समाजात चांगले स्थान मिळावे म्हणून या मेळावचे आयोजन करण्यात आले होते.

घटस्फोटीत, विधवा, विधुर यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद फुलविण्यासाठी देवांग कोष्टी समाज पुणे हे गेले चार वर्षापासून हा उपक्रम राबवित आहेत. याही वर्षी सुमारे 60 वधूवरांनी नाव नोंदणी केली व मेळाव्यात उपस्थित राहून आपला परिचय करून दिला.

Google Ad

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. अविनाश सांगोलकर सर, श्री. सुभाष नडे, पेठ वडगाव चे समाजाचे अध्यक्ष श्री सचिन लोळे, श्री. अशोक मकोटे, प्रदीप शेट्ये इत्यादी मान्यवर हजर होते.

कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या आरती करून व दीप प्रज्वलन करुन झाली. सौ. मेघमाला पांडकर यांनी प्रार्थना म्हटली व कार्यक्रमास सुरुवात केली.

याप्रसंगी श्री. सांगोलेकर सर, श्री. सुभाषराव नडे, श्री. सुरेश तावरे, श्री. प्रदीप शेट्ये, श्री. सचिन लोळे, श्री. भगवान गोडसे, इत्यादी मान्यवरांनी या मेळाव्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले, तर सुनील ढगे यांनी सर्व मान्यवर उपस्थीतांचे
आभार मानले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!