Categories: Editor Choice

अमृता फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह टीका भोवली , नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ फेब्रुवारी) : नवी मुंबईतील आंदोलनात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह भाष्य केल्याने नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अशोक गावडे यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आघाडीच्या पक्षांनी नवी मुंबईत शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) निदर्शने केली. यावेळी अशोक गावडे यांची जीभ घसरली होती.

अशोक गावडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीविषयी अश्लाघ्य भाषा वापरली. याचे पडसाद नवी मुंबईत उमटले. नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा आमदार अनुक्रमे मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांनी अशोक गावडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाशी पोलीस ठाणे आणि पोलीस उपायुक्त कार्यालय गाठले. ही घटना घडल्यानंतर अशोक गावडे यांनी त्याच रात्री १० वाजता पत्रकार परिषद घेत माफीही मागितली होती.

या प्रकारावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शशिकांत शिंदे यांनीही समाजमाध्यमातून दिलगिरी व्यक्त केली. मात्र भाजप नेत्यांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आणि वाशी पोलीस ठाण्यात कलम ५०९ नुसार महिलेस लज्जा वाटावी, तिला अपमानित करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या घटनेने ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अडचणीत आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago