Categories: Editor Choice

दापोडी येथे मोरया हॉस्पिटलच्या सहकार्याने ३० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू

महाराष्ट्र 14 न्यूज : शहरात कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत. रुग्णांना सेवा देण्यासाठी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. या पाश्र्वभूमीवर दापोडी येथील मोरया हॉस्पिटल मधील जयंता डांगरे, डॉ.पवन लोढा यांच्या प्रयत्नातून दापोडी मध्ये ३० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. मोरया हॉस्पिटल यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरचे उदघाटन मंगळवार (दि. ४) रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोसरी गुन्हे  शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत साबळे, डॉ. वैशाली लोढा, डॉ. राजकुमार निकाळजे, डॉ. महेश शेटे, डॉ.दीपक गोरे, डॉ. रेणुका कोल्हे, डॉ. किरण साबळे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शहरात विविध ठिकाणी जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. परंतु दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या मोठी असल्याने हे कोविड सेंटर कमी पडू लागली आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना बेड मिळत नाहीत. अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जयंता डांगरे, डॉ.पवन लोढा यांच्या माध्यमातून दापोडीमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मोरया हॉस्पिटलच्या सहकार्याने हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

दापोडी, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, फुगेवाडी, या भागातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यासाठी या कोविड केअर सेंटरचा मोठा आधार मिळणार आहे. जयंता डांगरे, डॉ.पवन लोढा यांची टीम रुग्णांची सेवा करणार आहे. यावेळी अमर बिराजदार, विशाल निकाळजे, सचिन पाटील, रविराज साबळे, कैलास मोरे, सुहास साळुंके. यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले. येथील हॉस्पिटल मध्ये तज्ञ डॉक्टर, ३० बेड कोविड, ७ बेड ऑक्सिजन बेड सर्व सुविधांयुक्त कोविड सेंटर उपलब्ध करण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

10 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago