Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड मध्ये नगरसेविकेच्या मुलाची स्वतःवर गोळी झाडून घेत राहत्या घरी आत्महत्या!

महाराष्ट्र 14 न्यूज : नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा प्रसन्न (वय- वर्ष २१) याने होळीच्या दिवशी रविवारी रात्री राहत्या घरातच आपल्या वडिलांच्या पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण समजू अद्याप समजू शकले नाही. पोलिस तपास करत आहेत. या घटनेनंतर प्रसन्नला जवळच आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते, पण डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं.

या घटनेमुळे चिंचवड वाल्हेकरवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. चौपाटी चौकात चिंचवडे यांचा बंगला आहे. करुणा चिंचवडे यांचे एकत्र कुटुंब आहे. सर्वांनी रात्रीचे एकत्र जेवण केले आणि त्यानंतर प्रसन्न वरच्या मजल्यावर गेला. साडेनऊ च्या सुमारास ही घटना झाल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, रुग्णालयातही मोठ्या संख्येने नगरसेवक आणि नागरिकांनी गर्दी केली होती.

 

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago