नगरसेवक सागर आंगोळकर यांनी ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर’ योजनेसाठी घेतला पुढाकार … पथ विक्रेत्यांना लाभ घेण्याचे केले आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना , राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ( DAY – NULM ) अंतर्गत नागर वस्ती विकास योजना विभाग यांनी पथविक्रेत्यांकरीता योजना जाहीर केली आहे.

🔴प्रधानमंत्री पथविक्रेता ( फेरीवाले ) आत्मनिर्भर स्वनिधि🔴

कोविड १९ च्या पार्श्वभुमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे . त्यामुळे केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ( PM SVANIDHI ) योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे . या योजनेचा आपल्या भागातील पथविक्रेत्यांना लाभ व्हावा याकरिता ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक सागर आंगोळकर यांनी आपल्या संपर्क कार्यालयात या योजनेचे फॉर्म भरणे व माहिती देण्यात येणार आहे.

🔴योजनेची उद्दिष्टे :-

१ ) पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून खेळते भांडवल रक्कम रु १०,000 कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देणे .
२ ) नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे .
३ ) डिजिटल व्यवहारात प्रोत्साहन देणे .

➡️लाभार्थी पात्रता निकष :-

१ ) दिनांक २४ मार्च २०२० वा त्यापूर्वीचे पथ विक्रेते .
२ ) महानगरपालिकेने प्रदान केलेले विक्री प्रमाणपत्र / ओळखपत्र असलेले पथ विक्रेते . ( Category A )
३ ) महानगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणात आढळलेले परंतु त्यांना विक्री प्रमाणपत्र / ओळखपत्र दिले गेले नाही असे per fashet . ( Category B )
४ ) महानगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणांत जे पथविक्रेते वगळलेले आहेत किंवा ज्यांनी सर्वेक्षण पुर्ण झाल्यानंतर विक्री सुरु केली आहे आणि त्यांना महानगरपालिका किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारसपत्र जारी केले आहे असे पथविक्रेते . ( Category C )
५ ) आसपासच्या विकास पेरी शहरी / ग्रामीण भागातील पथविक्रेते महानगरपालिका क्षेत्रामध्ये पथविक्री करतात आणि त्यांना महानगरपालिका किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारस पत्र जारी केले आहे असे पथविक्रेते . ( Category D )

🔴लाभाचा तपशील :-

१ ) नगरविक्रेता १ वर्षाच्या परतफेड मुदतीसह रु . १०,००० पर्यंतचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास व त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील .
२ ) सदर कर्जावर RBI च्या प्रचलित दराप्रमाणे व्याजदर लागू राहील .
३ ) विहित कालावधी मध्ये कर्ज परतफेड केल्यास ७ % व्याज अनुदान मिळवण्यास पात्र .
४ ) डिजिटल माध्यमातून व्यवहार केल्यास कॅशबॅक सुविधेस पात्र .

➡️पथविक्रेता कर्ज अर्ज पद्धत :-

१) http://pmsvanidhi.mohua.gov.in वेबसाईटद्वारे अर्ज करणे . २ ) सीएफसी केंद्र यांचे द्वारे अर्ज करु शकतात .
३ ) आधार कार्ड व आधार कार्ड संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक .
४ ) मनपाने दिलेले पथविक्रेता प्रमाणपत्र .
५ ) निवडणूक ओळखपत्र .

अधिक माहितीसाठी –
http://pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज भरा.किंवा आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्राला आजच भेट द्या असे पिं.चिं.म.न.पा. च्या वतीने कळविण्यात आले आहे.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क करण्याचे आवाहन प्रभाग क्रमांक २९ चे नगरसेवक सागर आंगोळकर यांनी पथविक्रेत्यांना केले आहे.

🔴जनसंपर्क कार्यालय , ६० फुटी रोड , हॉटेल मैफिल जवळ , देवकर पार्क , पिंपळे गुरव ,
श्री.सागर सुनील आंगोळकर ( नगरसेवक पिं.चिं.मनपा . )

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago