कोरोनाच्या काळात अविरत सेवा करणाऱ्या प्रभाग ३१ मधील आरोग्य कर्मचाऱ्यांना नगरसेविका ‘माधवी राजापुरे’ यांच्या तर्फे वाफेचा माशीनचे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना या आजाराचा संसर्ग मार्च महिन्यात आपल्या देशात राज्यात त्याचबराबर आपल्या आजूबाजूला म्हणजेच पिंपरीचिंचवड मध्ये सुरू झाला. याला आता जवळजवळ सात महिने होऊन गेले. याच आजाराला कोविड-१९ असे म्हटलं गेले.

कोविड-१९ चा संसर्ग खूपच झपाटयाने वाढत गेला, त्याला थांबवणं हे एक मोठं आव्हान प्रशासना पुढे उभे राहिले. या अचानक आलेल्या संकटाचा सामना सर्वचजण आपल्या परीने करत होते, यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य निष्ठने निभवणारे योद्धे म्हणजे आरोग्य कर्मचारी, ज्यांचा यात अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. या संकट काळात हा संसर्ग वाढू नये, म्हणून सर्व कामकाज बंद ठवण्यात आले लोक घरच्या बाहेर पडत न्हवते,आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी प्रत्येक नागरिक करत होता आणि आताही करत आहे.

अशा या महामारीच्या संकट काळात आपल्या जीवाची कुटुंबाची पर्वा न करता संपूर्ण शहर – परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती ते आरोग्य कर्मचारी होय. रात्रंदिवस जनतेच्या आरोग्यासाठी ते धडपडत आहेत. नवी सांगवी पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक ३१ मध्ये लाॅकडाऊन काळात ‘कोरोना’ या संसर्गजन्य महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता स्वच्छतेसाठी अमूल्य योगदान व सेवाकार्यासाठी मनपा सफाई कर्मचारी व आरोग्य निरीक्षक’ हे आपले कर्तव्य बजावत आहेत.

या कार्याची परतफेड करणे हे आपले कर्तव्य आहे, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने नगरसेविका माधवी राजापुरे तसेच त्यांचे पती राजेंद्र राजापुरे यांनी आपल्या आई कै. सुशीला शंकर राजापुरे यांच्या स्मरणार्थ ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली ८० वाफेच्या माशीनचे वाटप या आरोग्य कर्मचाऱ्यांना करण्यात आले.

काटे पूरम चौकातील महानगरपालिकेच्या बॅडमिंटन हॉल येथे हा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमास ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेविका माधवी राजापुरे , स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, भाजपचे प्रभाग ३१ चे अध्यक्ष मारुती कवडे, सांगवी-काळेवाडी मंडल उपाध्यक्ष सुरेश शिंदे, चिटणीस भाऊसाहेब जाधव, श्रीकांत पवार, अदिती निकम, संजय मराठे समाजिक कार्यकर्ते सुभाष पवार,महेंद्र राजापुरे, शिवाजी पोवार

पत्रकार संतोष महामुनी सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले साहेब, मुख्य आरोग्यनिरीक्षक अजय जाधव, आरोग्य निरीक्षक उध्दव डवरी, संजय मानमोडे, सुनिल चव्हाण व इतर सामाजिक व राजकिय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी ८० कर्मचारी व अधिकारी यांना सुरक्षा साधने वाटप करण्यात आले. संजय जैन यांनी वाफेचे मशीन कसे हाताळायचे याचे प्रात्यक्षिक कर्मचाऱ्यांना दाखविले. तसेच राजेंद्र राजापुरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आपली तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 weeks ago