पिंपरी चिंचवड मनपाच्या दहावी बारावी उत्तीर्ण बक्षीस योजनेचा लाभ घेण्याचे “नगरसेविका माधवी राजापुरे’ यांचे विद्यार्थ्यांना आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यार्थी/विद्यार्थ्यांनींना पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत बक्षीस योजना “इतर कल्याणकारी योजना २०२०-२१” जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेत मार्च २०२० मध्ये झालेल्या इयत्ता १० वी मध्ये ९०%पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्यांना १५०००/- रुपये आणि ८०% ते ९०% पर्यंत गुण संपादन केलेल्यांना १००००/- रुपये तसेच इयत्ता १२ वी मध्ये ८०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण संपादन केलेल्यांना १५०००/- रुपये महापालिकेच्या वतीने प्रोत्साहन म्हणून बक्षीस दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्याकरिता सदर योजनेचे फाॅर्म उपलब्ध असुन ज्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी सौ.माधवी राजापुरे, नगरसेविका यांच्या आॅफिस मधुन फाॅर्म घेऊन जावेत आणि जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन राजेंद्र राजापुरे आणि सौ माधवी राजापुरे नगरसेविका यांनी विद्यार्थी आणि पालकांना केले आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( साक्षांकित प्रतीत ) १) अर्जदाराने अर्जासोबत आधारकार्ड जोडणे आवश्यक . ( पिं . चिं . मनपा हद्दीतील ) २) अर्जदाराने अर्जासोबत मतदार ओळखपत्र / मतदार यादीची प्रत या दोन्हीपैकी एक पुरावा जोडावा . ( पालकांचे )३) इयत्ता १० वी / १२ वी उत्तीर्ण झालेबाबतची गुणपत्रिकेची प्रत
टीप : १ ) स्वयंसाक्षांकन प्रमाणपत्राचा नमुना नागरी सुविधा केंद्रामध्ये ( CFC ) उपलब्ध आहे . २ ) इ . १० वी परिक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रथम वर्षीच लाभ मिळणेकामी अर्ज करावा . ३ ) पिंपरी चिंचवड मनपा शाळेतील विद्यार्थी / विद्यार्थीनीनी अर्ज करू नये .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago