कंपन्यांनी सीएसआर फंडातून पिं.चिं. महानगरपालिकेस दिले ५० ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स … कोरोनाच्या रुग्णांना मिळणार मोफत सुविधेचा लाभ!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ मे २०२१) : कोरोना रुग्णाची ऑक्सीजन अभावी प्रकृती बिघडल्यास तातडीची उपाययोजना म्हणून कोरोना रुग्णांना तात्पुरत्या स्वरुपात घरी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. अनेक खासगी कंपन्या सामाजिक बांधिलकीतून महानगरपालिकेस शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून विविध यंत्रसामुग्री देत आहेत.  त्याबद्दल महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कॉनफेरडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्रीज आणि सॅनी हेव्ही इंडस्ट्री प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीमार्फत सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) महानगरपालिकेचे ५० ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स आज सुपूर्त केले.   यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, कॉनफेरडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्रीज कंपनीचे अध्यक्ष तथा सॅनी हेव्ही इंडस्ट्री प्रायव्हेट लिमीटेड ते व्यवस्थापकीय संचालक दिपक गर्ग, उपव्यवस्थापक श्रीबाल पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्सची मागणी करावयाची झाल्यास त्यांनी महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर ७७६८००५८८८ संपर्क करावा.  ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्सची मागणी केल्यास प्राप्त ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स मधून रुग्णांच्या घरी पोहोच करुन ते ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स स्थापित करुन देणेबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.  सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत प्रस्तुतच्या कामाकाजासाठी १ वैद्यकीय अधिकारी व ३ कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.  अशी माहिती महापौर माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके  यांनी दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

12 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

13 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

23 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

23 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago