महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सोमवार ( दि. २८ सप्टेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ५५४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आज ९५९ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आज पिपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे काळभोरनगर ( पुरुष ६५ वर्षे ) निगडी ( पुरुष ५६ वर्षे , पुरुष ७२ वर्षे ) चिखली ( पुरुष ५३ वर्षे पुरुष वर्षे ) सांगवी ( पुरुष ६५ वर्षे ) चिंचवड ( स्त्री वर्षे ) वाकड ( स्त्री २९ वर्षे ) पुनावळे ( पुरुष ८५ वर्षे ) वाल्हेकरवाडी ( पुरुष ७० वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे देहूगांव ( स्त्री वर्षे ) मुळशी ( स्त्री ५५ वर्षे ) आंबेगांव ( स्त्री ६५ वर्षे ) लोणावळा ( पुरुष वर्षे ) चाकण ( पुरुष वर्षे ) येथील रहिवासी आहे .
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…