महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ – चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी प्रदूषण या प्रमुख समस्या आहेत. आणि या समस्या सोडविण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने पावले उचलली आहेत. पवना नदीसह भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाण्याची उपलब्धता असेल, मेट्रो – रिंगरोडच्या माध्यमातून वाढणारी वाहतूक कनेक्टिव्हिटी असेल किंवा नदीसुधार प्रकल्पाच्या असेल या माध्यमातून शहरातील या महत्वाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी महायुती सरकारने पाऊले उचलली आहेत. या कामांना वेग मिळाल्यास पुढील काही काळात चिंचवड मतदारसंघातील हे प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे महायुती सरकारच्या हातात बळकटी देण्यासाठी चिंचवडवासीयांनी या निवडणुकीत मला साथ द्यावी; असे आवाहन महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी यावेळी केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार जगताप शंकर पांडुरंग यांच्या प्रचारार्थ चिंचवडगाव येथे झंझावाती प्रचार दौरा संपन्न झाला. या प्रचार दौऱ्यात चिंचवडकरांनी शंकर जगताप यांची घोडागाडीतून जंगी मिरवणूक काढत जोतदार स्वागत केले.
यावेळी चिंचवडगावातील नवतरुण मित्र मंडळ, पडवळ आळी, इंदिरा पार्क, गोखले वृंदावन, शांतीबन, काकडे कॉर्नर, दत्त मंदिर, सोनीगरा निलय, रिव्हर रोड, रॉयल क्लासिक, सिल्वर गार्डन, वेताळ नगर, पवनानगर, रस्टन कॉलनी, भोई आळी, मेट्रो पॉलिटेन, सावित्रीबाई फुले उद्यान, हिररांजा, आनंदी बाई डोके उद्यान, काकडे टाऊनशिप मधील सर्व इमारती तसेच सोनिगरा टाऊनशिप, श्यामा हेरिटेज, ओरिएंटल, गोयल गरिमा, मोरया राज पार्क, कीन्स्टाऊन सोसायटी, शेजल पार्क, ग्लोसम निंबाळकर हाईट्स या परिसरातील नागरिकांना आणि सदनिकाधारकांना भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी चिंचवड गावातील माळी आळी, गांधी पेठ येथील ज्ञानदीप मित्र मंडळ, जुना जकात नाका येथील राणा प्रताप मित्र मंडळ, तालेरा नगर येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, भोई आळी येथील उत्कृष्ट तरुण मंडळ, भाजी मंडई जवळील नवतरुण मंडळ, चिंचवडचा राजा चौक येथील श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, चिंचवड गावठाण येथील श्री. काळभैरवनाथ मित्र मंडळ, पावर हाऊस चौक येथील नव गजानन मित्र मंडळ, श्रीराम मंदिराजवळील क्रांतिकारक भगतसिंग मित्र मंडळ, गांधी पेठ येथील मंगलमूर्ती वाड्याजवळील श्री मयुरेश्वर मित्र मंडळ, गणेश पेठ येथील अष्टविनायक मित्र मंडळ यांसह विविध सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांनी शंकर जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांना जाहीर पाठींब्याचे पत्र दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, माजी नगरसेवक नाना काटे, माजी महापौर अपर्णा डोके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, तुषार हिंगे, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, ऍड. संदीप चिंचवडे, शप्रशांत शितोळे, शैलेश मोरे, शरद बारहाते, मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर, जयश्री गावडे, बाळासाहेब वाल्हेकर, संतोष माचूत्रे, महेश कुलकर्णी, सुरेश चिंचवडे, पै. विजय गावडे, राजाभाऊ पवार, दत्ता चिंचवडे, आवेश चिंचवडे, शमीम पठाण, नागेश अगज्ञान, उज्वलाताई गावडे, सुजित पाटील, रेखा गावडे, अनिता फरांदे, हरिभाऊ तिकोने, सुभाष चिंचवडे, प्रवीण यादव, अशोक चिंचवडे, प्रशांत अगज्ञान, शिवम लांडगे, अजित कुलथे, रवी देशपांडे, राजेंद्र सराफ, गणेश गावडे, हरिभाऊ चिंचवडे, मधुकर बच्चे, विलास चिंचवडे, अमर गावडे, पप्पू सुपेकर, प्रदीप सायकार, रवींद्र प्रभुणे, नूतन चव्हाण, साधना मांडे, पल्लवी पाठक, दिपाली कलापुरे, शुभांगी भसे, रत्नमाला चिंचवडे, सुनिता मोरे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध सार्वजनिक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
स्व. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांनी कायम विकासाचे राजकारण केले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यांनी मतरुपी जो विश्वास आपल्यावर दाखविला आहे, त्या विश्वासाला तडा न जाऊ देता प्रामाणिकपणे त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी झटले पाहिजे ही लक्ष्मणभाऊंची आम्हाला शिकवण आहे. त्यांची हीच शिकवण आचरणात आणून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जे महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी मी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून या समस्या सोडविणार, असा विश्वास मी तुम्हाला देतो.
– शंकर जगताप
(महायुतीचे उमेदवार)
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…