महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.10 फेब्रुवारी) : पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‘बॅकफुट’वर गेली आहे. विशेष म्हणजे, याचा फायदा भाजपा+बाळासाहेबांची शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना होणार असून, त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये आज (दि. १०) शेवटच्या दिवशी ५ जणांनी माघार घेतली आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत ३३ पैकी पाच जणांनी माघार घेतल्यामुळे तब्बल २८ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणार उरले आहे.
▶️यांनी घेतले आपले उमेदवारी अर्ज माघार ...
१) राजेंद्र मारुती काटे २) भाऊसाहेब रामचंद्र अडागळे ३) प्रविण अशोक कदम ४) अॅड. मनिषा मनोहर कारंडे ५) रविंद्र पारधे (सर)
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…