महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ मार्च) : नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीनंतर भाजपच्या वतीने आभार मेळाव्याचे आयोजन राहटणी येथे करण्यात आले. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांना प्रचंड बहुमताने विजयी केले. या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षाचे खासदार, आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, केंद्रप्रमुख, बुथप्रमुख, पेजप्रमुख, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच ज्ञात अज्ञात सर्वांनीच या विजयासाठी परिश्रम घेतले. या सर्वांचे आभार मानण्यासाठी आज विमल गार्डन, रहाटणी येथे हा आभार मेळावा घेण्यात आला.
रहाटणी येथे झालेल्या आभार मेळाव्यात चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार ‘अश्विनी लक्ष्मण जगताप‘ यांनी विजयासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानले. या मेळाव्यामध्ये भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख शंकर जगताप यांनीही सर्वांचे आभार मानले, त्यावेळी ते म्हणाले “जनतेने भाजपवर दाखविलेल्या विश्वासास आम्ही कधीही तडा जावू देणार नाही, जनतेने दाखविलेला विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे नक्कीच ऋणी राहू, मात्र जनतेचे आभार मानणे हे देखील आमचे कर्तव्य आहे”. तसेच आगामी निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पुन्हा जिंकण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार व भाजपा शहराध्यक्ष मा.महेशदादा लांडगे, आमदार सौ. उमाताई खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी महापौर माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, सचिन साठे, मोरेश्वर शेडगे यांच्यासह सर्व मित्रपक्षांचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण…
गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…