Google Ad
Editor Choice

चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुक मतदानाच्या तारखा बदलल्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जानेवारी) : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत. 27 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने बदलली. आता २६ फेब्रुवारी रोजी होणार या दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक साठी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सह इतर राज्यात देखील होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या तारखा काही दिवसांपूर्वी जाहीर केल्या होत्या.

पुणे जिल्हा निवडणूक आयोगाकडून पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांच्याबद्दल एक अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला होता. या दोन्ही पोटनिवडणुकी दरम्यान बारावीच्या परीक्षा आहेत असे हवलात नमूद केले होते. या गोष्टीची दखल घेतल्यानंतर आयोगाने चिंचवड आणि कसबा पेठ निवडणुकीच्या साठी होणाऱ्या मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement