Chakan : चौकात वाहतूक नियमन करत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण … पोलिस जागीच बेशुद्ध!

महाराष्ट्र 14 न्यूज : पोलिसांवर हल्ला होण्याची गंभीर घटना पुन्हा एकदा पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील चाकण परिसरात तळेगाव-चाकण चौकात वाहतूक नियमन करत असणाऱ्या पोलीस कर्मचारी रवींद्र करवंदे यांना लोखंडी रॉडने मारहाण करत केल्याच्या घटनेनं सध्या खळबळ माजवली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं जखमी अवस्थेत पोलीस कर्मचारी जागीच बेशुद्ध झाले.

ज्यानंतर त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. सदर प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. रवींद्र करवंदे हे त्यांचं कर्तव्य बजावत असतानाच शनिवाारी दुपारच्या सुमारास तळेगाव चाकण चौकात पाहतूक कोंडी झाली होती. ज्यानंतर त्यांनी आरोपीचा कंटेनर पाठीमागे घेण्यास सांगितलं. ज्यानंतर पोलीस आणि आरोपींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

हा राग मनात सदर इसमांनी दुचाकीवरुन येत करवंदे यांच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला करत घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपी रोहित साळवी आणि हर्षदीप कांबळे असे आरोपीची नावे हे दोघेही मुंबईचे रहिवासी असून, या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखा-3 च्या पथकाने केली आहे जिथं त्यांनी या गुन्ह्याची कबुलीही दिल्याचं कळत आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

7 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 week ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 week ago