Google Ad
Uncategorized

१०० टक्के निकाल लावत, पिंपळे गुरव मधील जिनियस क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या यशाची उत्तुंग भरारी !

 गुरव येथील जिनियस क्लासेसचा १०० टक्के निकाल

— समृद्धी काकडेला ९५ टक्के
संस्कृती जाधव ८९.८० तर दर्शिल गायकवाडला ८८.४ टक्के

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जून) : पिंपळे गुरव येथील जिनियस क्लासेसने एस एस सी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
क्लासेसची विद्यार्थीनी समृद्धी काकडे हिने ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.

संस्कृती जाधवने 89.80 टक्के गुण मिळवत द्वितीय तर दर्शिल गायकवाड याने 88.40टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

Google Ad

क्लासमधील सार्थक कांबळे (86.40),श्रीराज जगताप (82.80),दृष्टी गायकवाड(81.60),मानसी सुतार (80.60)तृप्ती कापसे ( 79.20) या विद्यार्थ्यांनी देखील घवघवीत यश संपादित केले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जिनियस क्लासेसमध्ये प्रत्येक विषयांसाठी तज्ञ, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक आहेत. क्लासमध्ये वर्षभर आमचा चांगल्या प्रकारे सराव करून घेतला.जास्तीत जास्त उत्तर पत्रिका सोडवून घेतल्या .गेस्ट लेक्चर्सचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जाता आले. माझ्या या यशात जिनियस क्लासेसचा मोठा वाटा आहे.

समृद्धी काकडे (विद्यार्थिनी)

 

जिनियस क्लासेसमध्ये तज्ञ शिक्षकांनी वर्षभर चांगल्या प्रकारे अध्यापन केले. माझ्या मुलीला मिळालेल्या या यशामध्ये क्लासमधील शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.
क्लासच्या संचालिका मासाळ मॅडम यांनी वैयक्तिक लक्ष दिले. क्लासचे नेहमीच सहकार्य लाभले. जिनियस क्लासेला मन:पूर्वक धन्यवाद !

रेशमा काकडे
पालक

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!