Editor Choice

Latur : वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७० : ३० हा फॉर्म्युला रद्द करा … आमदार ‘धिरज देशमुख’ यांची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७० : ३० चा फॉर्म्युला (कोटा) लातूरसह मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा, त्यांच्या स्वप्नांना भरारी घेण्यापासून रोखणारा आहे. हा फॉर्म्युला रद्द करण्यात यावा, अशी मागणी आमदार धिरज देशमुख यांनी शनिवारी केली. संपूर्ण महाराष्‍ट्रातील वैद्यकीय प्रवेशप्रक्रिया सरसकट गुणवत्‍ता यादी आधारे करावी, असेही ते म्हणाले.

वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७० : ३० चा फॉर्म्युला रद्द करण्यात यावा, असे पत्र वैद्यकीय शिक्षणमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे आमदार धिरज देशमुख यांनी दिले. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेला ७०:३० हा फॉर्म्युला लातूरबरोबरच मराठवाड्यातील हजारो गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. गुणवत्ता असूनही अनेक विद्यार्थाना प्रवेश घेता येत नाही, असे धीरज देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.

लातूर हे शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. येथे राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. माजी मुख्यमंत्री आदरणीय स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या धोरणांमुळे लातूरचा शैक्षणिकदृष्ट्या कायम विकास होत राहिला आहे. त्यातूनच ‘लातूर पॅटर्न’साठी पोषक वातावरण निर्माण झाले आणि लातूरचे नाव देशभर पोचले. लातूरसह मराठवाड्यात एकुण ५ वैद्यकीय महाविद्यालये असून त्‍यात एकुण ८०० जागा आहेत.

तर विदर्भात शासकीय व खासगी एकुण ८ वैद्यकीय महाविद्यालये असून त्‍यात एकुण १,४०० जागा आहेत आणि उर्वरीत महाराष्‍ट्रात शासकीय व खासगी अशी एकुण २७ वैद्यकीय महाविद्यालये असून त्‍यात एकुण ४,१०० जागा आहेत. त्‍यामुळे या फॉर्म्युल्यानुसार गुणवत्‍ता असून देखील लातूरसह मराठवाड्यातील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहत आहेत. याची आपण दखल घेऊन आपण योग्य तो तोडगा काढावा, असे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago