रुग्णाला कोरोना आणि म्युकरमायकोसिसची एकाचवेळी लागण होऊ शकते का?

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात अक्षरश: थैमान घातले आहे. हजारो लोक दररोज कोरोनामुळे मृत्युमुखी पडत आहेत. सध्याच्या घडीला भारत हा सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. रुग्णांच्या प्रचंड संख्येने देशातील आरोग्यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली आहे. अशातच आता एक नवे संकट भारतासमोर उभे ठाकले आहे. कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या घातक रोगाची लागण होताना दिसत आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.

म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी या नावाने ओळखला जाणारा हा आजार कोरोनापेक्षाही भयंकर आहे. त्यामुळे आता अनेकजण कोरोना आणि म्युकरमायकोसिसची एकाचवेळी लागण होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

▶️कोरोना आणि म्युकरमायकोसिसची एकाचवेळी लागण होऊ शकते का?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोना आणि म्युकरमायकोसिसची एकाचवेळी लागण होऊ शकते. ज्या कोरोना रुग्णांची प्रकृती अतिश्य गंभीर असेल किंवा ज्यांना एडस् आणि डायबेटीस यासारख्या सहव्याधी असतील त्या रुग्णांना कोरोना आणि म्युकरमायकोसिस एकाचवेळी होऊ शकतो. तसे झाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.

मात्र, सध्या भारतात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होताना दिसत आहे. म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून हवेतूनही त्याचा प्रसार होऊ शकतो. सध्याच्या घडीला तरी याचा प्रसार रोखण्याचे तितकेसे प्रभावी मार्ग उपलब्ध नाहीत. केवळ योग्य वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.

▶️म्युकरमायकोसिसची लक्षणे कोणती?
* ताप
* सर्दी
* नाकातून सतत पाणी वाहणे
* डोकेदुखी
* श्वास घेताना त्रास जाणवणे

▶️कोरोनासोबत तुम्हाला आणखी कोणत्या बुरशीजन्य आजारांची लागणही होऊ शकते?
कोरोनासोबत तुम्हाला आणखी काही बुरशीजन्य आजारांची लागण होऊ शकते. बुरशीजन्य आजाराचे साधारणत: एस्पेरगिलोसिस (Aspergillosis) आणि कॅनडिडायसिस (candidiasis) असे दोन प्रकार असतात. हवेतील बुरशी शरीरात गेल्यास या आजारांची बाधा होते.

▶️एस्पेरगिलोसिस– एस्पेरगिलोसिस हा फुफ्फुसांचा आजार आहे. माती आणि झाडांवर आढळणारी बुरशी शरीरात गेल्यास या आजाराची लागण होऊ शकते.

▶️इन्वासिव्ह कॅनडिडायसिस– कँडिडा बुरशीमुळे हा आजार होऊ शकतो. अँटीबायोटिक्स औषधे घेऊनही तुमचा ताप किंवा सर्दी जात नसेल तर तुम्हाला या आजाराची बाधा झाल्याची शक्यता आहे.

▶️म्युकरमायकोसिस– हवेत असणाऱ्या काळ्या बुरशीमुळे या आजाराची लागण होऊ शकते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या किंवा सहव्याधी असलेल्या लोकांना म्युकरमायकोसिसची लागण होण्याची शक्यता जास्त असते.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

8 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago