मिलिंदनगर, पिंपरी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारत क्र. ए २ मधील पाच सदनिकांचे महापौरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात हस्तांतरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ मे २०२१) : आपले स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि आज महानगरपालिकेच्या माध्यमातून हे स्वप्न साकार होत आहे याचा खूप आनंद होत आहे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

महानगरपालिकेच्या वतीने मिलिंदनगर, पिंपरी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारत क्र. ए २ मधील पाच सदनिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात हस्तांतरण महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी त्या बोलत होत्या.

या वेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य संदिप वाघेरे, नगरसदस्या उषा वाघेरे, निकिता कदम, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता शिरिष पोरेड्डी, उपअभियंता अनघा पाठक, माहिती व जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच अन्य लाभार्थींना सदनिकांचे वाटप करण्यात येणार असून लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या घराचा वापर स्वत: करावा आणि घराचा आनंद घ्यावा असे सांगून त्यांनी लाभार्थ्यांना आणि संपुर्ण शहरवासियांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

जे.एन.एन.यु.आर.एम. आणि बी.एस.यु.पी. अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने मिलिंदनगर, पिंपरी येथे ५ इमारती बांधण्यात आल्या होत्या. त्यातील २ इमारतीमधील सदनिकांचे हस्तांतरण आज सुरु झाले. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मोठा कार्यक्रम टाळून प्रातिनिधिक स्वरूपात शेखर महाडीक, अशोक राजपूत, चॉंद खान, कासिमबी पठाण आणि सुनंदा साबळे या पाच जणांना सदनिका हस्तांतरण करण्यात आल्या.

सदर दोन इमारतींमध्ये प्रत्येकी ११२ सदनिका  आहेत. इमारतीमध्ये जिन्याबरोबरच लिफ्टचीही व्यवस्था आहे. २७० चौरस फुटाच्या चटई क्षेत्राच्या सदनिकांमध्ये हॉल, किचन आणि संडास बाथरुम यांचा समावेश आहे. सात मजली इमारतीच्या तळ मजल्यावर वाहनतळ करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार माहिती व जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

11 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

18 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago