Google Ad
Uncategorized

मेव्हण्याने दाजीचे एका बुक्कीत पाडले चार दांत … पुण्यातील मुंढवा येथिल घटना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जुलै) : पुण्यातील मुंढवा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेव्हणा आणि दाजीचे यांचात वाद होऊन हाणामारी झाली. या हाणामारीत मेव्हण्याने दाजीचे एका बुक्कीत चार दात पाडले. ही घटना १६ जुलैला घडली असून या प्रकरणी सोमवारी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र देवदास पाटील (वय ४५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मेव्हण्याचे नाव आहे. तर या प्रकरणी सयाजी साहेबराव बोरसे असे जखणी दाजीचे नाव असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Google Ad

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सयाजी साहेबराव बोरसे यांचे बऱ्याच दिवसांपासून त्याच्या मेव्हण्यासोबत कौटुंबिक वाद आहेत. त्याचा राग मनात धरून सयाजी बोरसे यांनी आरोपी जितेंद्र पाटील यांना फोन केला. यावेळी तुझ्यामुळे माझं खूप नुकसान झालं आहे, असे बोलून त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी जितेंद्र पाटील हे त्यांच्या पत्नी आणि मुलासह बोरसे यांच्या घरी गेले.

दरम्यान, जितेंद्र पाटील यांनी फिर्यादी सयाजी बोरसे यांच्या मुलाला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी जितेंद्र पाटील यांनी बोरसे याच्या तोंडावर हाताने बुक्की मारली. यामुळे फिर्यादी सयाजी बोरसे यांचे चार दात तुटले. या वाबत सयाजी यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहे.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!