महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी नानी उर्फ हिराबाई गोवर्धन घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपमहापौरपदाच्या निवडीसाठी आज महापालिकेची विशेष सभा महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. पुणे विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी या सभेचे पिठासीन प्राधिकारी म्हणून काम पाहिले.
निवडणूकीच्यावेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, प्रभारी कायदा सल्लागार तथा उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते. नगरसचिव उल्हास जगताप यांनी सभेचे प्रशासकीय कामकाज पाहिले.
नवनिर्वाचित उपमहापौर नानी उर्फ हिराबाई गोवर्धन घुले यांचे महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील, पिठासीन प्राधिकारी रुबल अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केेलेे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…