Categories: Uncategorized

कसबा हारल्याचा भाजपा घेणार बदला … चंद्रकांत पाटील यांनी घेतली ठाकरे गटाच्या या माजी आमदाराची भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : पुणे भाजपमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरु आहे. कसबा हारल्याचा आम्ही बदला घेणार, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. तर येत्या ३० तारखेपर्यंत पुणे भजपत मोठे बदल होतील. २०२४ पर्यंत भाजपात अनेक मोठे नेते येतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता . यामुळे पुणे शहरात भाजप मजबूत करण्यासाठी इतर पक्षातील कार्यकर्ते, नेत्यांना घेतले गेले तर आश्चर्य वाटायला नको. तसेच प्रदेश कार्यकारणीच्या पुण्यातील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष मजबूत करण्यावर भर दिला होता. ते म्हणाले होते की, येत्या निवडणुकीत महापालिका, लोकसभा, विधनासभा, निवडणुकीत आपणच जिंकणार आहोत.

चंद्रकांत पाटील यांनी घेतली ठाकरे गटाच्या माजी आमदाराची शनिवारी भेट घेतली. ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या निवासस्थानी जाऊन चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. चंद्रकांत पाटील आणि चंद्रकांत मोकाटे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. मात्र ही भेट राजकीय नसल्याचं चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण करण्यात आले. परंतु ही राजकीय भेट नव्हती तर कशासाठी भेट झाली? या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. ठाकरे गटाला पुन्हा धक्का देण्याची तर ही तयारी ना? अशी चर्चा होत आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातून आपला अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तत्पूर्वी त्यांनी त्यावेळी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची समजूत काढून त्यांना आपल्या रॅलीमध्ये सहभागी करून घेतले होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या आमदाराची भेट घेतली,  हे काही नवीन नाही.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक दोन दिवसांपूर्वी पुणे शहरात झाली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात भाजपमध्ये मोठे फेरबदल करण्याची घोषणा केली होती. कसब्याचा बदला आम्ही काढणार आहोत. येत्या ३० तारखेपर्यंत पुणे भजपत मोठे बदल होतील. २०२४ पर्यंत भाजपात अनेक मोठे नेते येतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यानंतर दोनच दिवसांत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या आमदाराची भेट घेतली. यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

 

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

16 hours ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

1 week ago

जीवनात प्रतिज्ञा महत्त्वाची : ज्ञानेश्वर महाराज कदम माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून भंडारा डोंगर येथील मंदिर उभारणीसाठी एक कोटींची देणगी

महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ :  जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…

3 weeks ago

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…

3 weeks ago