Categories: Uncategorized

पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ भाजप फोडणार … अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ नोव्हेंबर) : आगामी २०२२ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी नगरसेवक आणि आमदारांच्या नुकतीच बैठक झाली. बैठकीत भाजपचे महाराष्ट्र युनिट अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना मिशन मोडवर गती देण्याचे आणि सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारण्याचे आवाहन केले.

२०१४ च्या राज्यात विधानसभा निवडणुकीत, भाजपने पुणे शहरातील सर्व सहा जागा जिंकल्या होत्या, तर २०१७ च्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये मध्ये जोरदार विजय मिळवला होता.

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा २६ नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळतेय. अमित शहांच्या उपस्थितीत भाजप पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल. यावेळी महापालिका भवनात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन होईल. तसेच पालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणार आहे.

शहांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमित शहांच्या दौऱ्यासंदर्भात आज महापौर बंगल्यावर बैठक पार पडली.
पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात इतर महानगरपालिका निवडणुकी होणार आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago