Categories: Editor Choice

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी भरला अर्ज …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ फेब्रुवारी) : शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर चिंचवड विधानसभा परिसरातून रॅली काढून भारतीय जनता पक्षाच्या वतीने अश्विनी जगताप यांनी आज (दि.०६ फेब्रुवारी) दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या सोबत आमदार बंधू शंकर जगताप यांनीही आपला डमी अर्ज दाखल केलेला आहे.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये पोट निवडणूक होत आहे.

थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ प्रभाग कार्यालयामध्ये चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सुरू केले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयापासूनच नागरिकांनी या रॅलीमध्ये गर्दी केली होती. पिंपळे गुरव मधील मंदिरात दर्शन घेऊन या अर्ज भरण्याकरिता अश्विनी जगताप या पदयात्रेत सहभागी झाल्या. ही पदयात्रा पिंपळे गुरव सांगवीतुन निघून थेरगाव येथे आली, यात चिंचवड मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे यावेळी दिसत होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये दुपारी साडेबाराच्या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आदी उपस्थित होते. अश्विनी जगताप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे अर्ज सादर केला.

Maharashtra14 News

Recent Posts

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

1 week ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

2 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

4 weeks ago

छत्रपती कारखान्याचा कारभार दोन वर्गमित्रांकडे … जाचक नवे अध्यक्ष; तर कैलास गावडे नवे उपाध्यक्ष !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…

1 month ago