Categories: Uncategorized

मोठी बातमी! 2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार … या, तारखेनंतर चलनातून बाद होणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ मे) : आरबीआयने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. तोपर्यंत ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.

नोटा कधीपासून बदलता येणार?

आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा असलेल्या नागरिकांना बँकांमधून नोटा बदलण्याची सूचना केली आहे. बँकांमध्ये 23 मे पासून ही 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

एका वेळी किती नोट बदलता येणार?

एकावेळी फक्त 2 हजार रुपयांच्या नोटा 20 हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर 2000 हजार रुपयांची नोट चलनात आली. नोटाबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या.

मागील तीन वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही

2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही.

2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या वाढली

दरम्यान, संसदेत 1 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की NCRB डेटानुसार, 2016 ते 2020 दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 वरुन 2,44,834 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार 2016 मध्ये देशात 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 होती.

Maharashtra14 News

Recent Posts

द न्यु मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जंयती उत्साहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 18/2/2025, पिंपळे गुरुव : प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे, द न्यु मिलेनियम इंग्लिश…

3 days ago

लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडपट्टी धारकांच्या हक्काच्या घराचा “सदनिका हस्तांतरण सोहळा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी…

1 week ago

सावधान ! आता… पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर

सावधान ! पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी…

1 week ago

मा.अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच् डी प्रदान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ फेब्रुवारी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेंतर्गत अर्थशास्त्र विषयातील…

2 weeks ago

बारामती येथे कर्करोग मोबाईल व्हॅन व डिजिटल हेंड हेड एक्सरे मशीनचे राज्य सभा सदस्य खा.सौ. सूनेत्रा ताई पवार यांचे हस्ते लोकार्पण

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ फेब्रुवारी : आज दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी महिला रुग्णालय बारामती येथे…

2 weeks ago

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते सांगवी येथे आमदार चषक २०२५” उद्घाटन समारंभ

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०८ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात…

2 weeks ago