Google Ad
Uncategorized

पिंपळे गुरव मध्ये भैरवनाथ महाराजांचा शाही लग्नसोहळा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६एप्रिल) : पिंपळे गुरव येथील श्रीनाथ भैरवनाथ महाराजांचा शाही लग्नसोहळा प्रसंगी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी उत्साहात पार पडला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी समस्त गावकरी, ग्रामस्थ मंडळी, महिला वर्ग मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होता. शाही लग्न सोहळा पार पडल्यानंतर उपस्थितांनी मंदिरात गाभाऱ्यात जाऊन भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी दर्शनासाठी मोठी रांग लागली होती.

मंदिराच्या गाभाऱ्यासमोर जागरण गोंधळ घालण्यात आला. मंदिरात तसेच गाभाऱ्यात फुलांची रंगीबेरंगी झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. आज गुरुवार हनुमान जन्मोत्सव असल्याने यावेळी भैरवनाथ मंदिरातून जवळच असलेल्या हनुमान मंदिरात जाऊन भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी अबालवृद्ध, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!