Editor Choice

Delhi : पबजीसह ११८ मोबाईल अॅप्सवर बंदी … मोदी सरकारचा मोठा निर्णय!

महाराष्ट्र 14 न्यूज : पबजीसह ११८ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. मोदी सरकारन या अगोदरही जवळपास १०० हून अधिक चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता आणखी ११८ अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं घेतला आहे.

पबजीसह कॅमकार्ड, बायडू, कट कट, वूव, टेन्सेंट वेयून, राईज ऑफ किंग्डम्ज, झॅकझॅक यांच्यासह अनेक अ‍ॅप्सवर सरकारनं बंदी घातली आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका असल्यानं बंदीची कारवाई करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. ‘या कारवाईमुळे कोट्यवधी भारतीय मोबाईलधारक आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हितांचं संरक्षण होईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असं मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं ६९ ए च्या अंतर्गत पबजीसह ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या अ‍ॅप्सबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा विचारात घेऊन अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला, अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे. अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवरील अनेक अ‍ॅप्सबद्दल सरकारकडे तक्रारी आल्या होत्या, असंही मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.

याआधी मोदी सरकारनं टिकटॉकसह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जूनच्या अखेरीस टिकटॉक, हेलोसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई करण्यात आली. यानंतर जुलैमध्ये आणखी ४७ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सरकारनं पबजीसह लिविक, वीचॅट वर्क, वीचॅट रिडिंग, अ‍ॅपलॉक, कॅरम फ्रेंड्स यासारख्या मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago