महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला.
मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होते. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत. दीड महिन्यांपूर्वी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारावर विविध सहा पथकांनी हैद्राबादमधील कुख्यात बिलालनगर भागातील लॉजमधून पत्रकार बाळ बोठे यास शनिवारी पहाटे सहा वाजता ताब्यात घेण्यात आल्याची माहीती पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बोठे यास मदत करणाऱ्या नगरमधील एकास ताब्यात घेण्यात आले असून हैद्राबादमध्ये बोठे यास आश्रय देणारा वकील जनार्दन आकले व आणखी तिघांनाही हैद्राबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, बोठे यास मदत करणारांची संख्या वाढणार असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
"उत्तुंग यशाची परंपरा" महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक -२७ मे२०२४) : नवी सांगवी. (समर्थ नगर) प्रतिभा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…