Google Ad
Uncategorized

जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने औंध जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक रक्तदाता दिवस साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जून) :रक्तगटाचा शोध लावणारे ऑस्ट्रीयन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांच्या जयंतीनिमित्य सन २००४ पासून १४ जुन हा दिवस जगभरात रक्त आणि रक्तांची आवश्यकता, त्याची मागणी व त्याचा गरजेबद्दल जागरुता निर्माण करण्यासाठी आणि रक्तदात्यांचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी जागतिक रक्तदाता दिन म्हणुन साजरा केला जातो. यादिनाचे औचित्य साधुन पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालयात १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिनानिमित्ताने रक्तदाते व रक्तदान शिबिर आयोजक यांचा तसेच रांगोळी व पोस्टर स्पर्धा यांचे विजेते यांचा सत्कार करण्यात आला.

मेट्रो रक्तकेंद्र, औंध जिल्हा सामान्य रुग्णालय, पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,  या कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, उरो रुग्णालय वैद्यकीय अधीक डॉ. होसमानी, मेट्रन मॅडम, प्रशासकीय अधिकारी शृंगारे, रुण कल्याण समितीचे सदस्य डॉ. देविदास शेलार, शरीरविकृती विभाग प्रमुख डॉ. भगवान मेथे, स्त्री रोग तज्ञ डॉ. कविता कोरे, रक्तपेढी विभागप्रमुख डॉ. निशा तेली, डॉ. सुरेश पारधे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

Google Ad

या कार्यक्रमात अनेकवेळा रक्तदान केलेले श्री अजयकु‌मार कांबळे, २५ वेळा रक्तदान केलेले श्री शैलेश लोहार यांसारखे रक्तदाते व रक्तदान शिबिर आयोजक राजाभाऊ शिंदे- आझाद मित्र मंडळ, काळेवाडी, श्रीम. मीरा आरेकर, श्रीम. ओबेद अली संन्याय यांचा गुलाबपुष्प व बक्षीस देऊन सत्कार केला. रांगोळी व पोस्टर स्पर्धांचे विजेते यांचादेखील यावेळी बक्षीस देऊन सत्कार केला.

“भारतात दर 2 सेकंदाला एका रुग्णाला रक्ताची गरज असते. शिवाय, शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार आणि शारीरिक इजेमुळे रक्तसंक्रमणाची गरज असलेल्या रुग्णांसाठी रक्तदानाचा उपयोग होतो. एखाद्या व्यक्तीला देण्याची रक्त ही सर्वात मौल्यवान भेट आहे,” मानव कितीही प्रगत झाला तरी रक्त हे कृत्रिमरित्या तयार करता येत नाही.त्यामुळे माणसाचा प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

रक्तदानाचे महत्व पटवून देताना जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ नागनाथ येमपल्ले म्हणाले, की, मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानाने आपल्याला मिळत असते. तसेच समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण सर्वांनी रक्तदान करणे काळाची गरज आहे. एवढेच नव्हे तर रक्तदाता म्हणून सहभागी होवुन आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला प्रवृत्त करण्यासाठी पुढाकार घेणेबाबत त्यांनी आवाहन केले. रक्तदान केल्याने त्या रक्ताचा उपयोग होवुन एखादया रुग्णाचा जीव वाचविल्याचे व मदत केल्याचे आपणास समाधान मिळते.

सदर कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता मेट्रो रक्तकेंद्र विभागातील सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!