पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न … महापौर माई ढोरे

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन संदर्भातील बैठक पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार(25 सप्टेंबर) रोजी  आयोजित केली होती.  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरी चिंचवड शहराची कोरोना परिस्थितीची माहिती यावेळी दिली. शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्यामध्ये यश येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला कामगार व राज्य उत्पादन मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,विभागीय आयुक्त सौरभ राव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर ,पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार,जिल्हाधिकारी राजेश देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माई ढोरे यांना कोरोनासंबंधी काय परिस्थिती आहे आणि तुम्ही कसे नियोजन केले आहे यासंबंधी विचारणा केली.

यावेळी पिंपरी चिंचवड शहरासंबंधी माहिती देताना महापौर माई ढोरे म्हणाल्या की,  महापालिकेच्या माध्यमातून कोविड १९ संबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे  दिवसेंदिवस  शहरातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.  मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी उपयुक्त असलेल्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनच्या तुटवड्याकडे महापौरांनी उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. कोविड १९ वर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड शहरात सध्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु आहे. या अंतर्गत शहरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली  जाते आहे. यासाठी प्रत्येक प्रभागानुसार स्वयंसेवक घरांना भेटी देत असून नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

याचबरोबर गुरुवारी (२४ सप्टेंबर) जम्बो कोविड सेंटर मध्ये जाऊन रुग्णांशी व्हिडीओच्या माध्यमातून विचारपूस केली आहे. तसेच कोविड सेंटरची पाहणी केली.  रुग्णांना वेळेत पाणी, चहा, नाश्ता, जेवण मिळते का इथपासून सेंटरमधील स्वच्छतेची पाहणी केली. जम्बो कोविड सेंटरमध्ये सध्या ३०० रुग्ण आहेत. तर  अॅटो क्लस्टर मध्ये असलेल्या कोविड सेंटरमध्ये ३० रुग्ण असून ३ व्हेंटिलेटर वर असल्याची माहिती ढोरे यांनी दिली. यावेळी अजित पवारांनी कोविड सेंटरमध्ये जाताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला माई ढोरे यांना  दिला.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago