महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ ऑक्टोबर) : आज (दि.२१) पिंपरी-चिंचवड शहरातील नवी सांगवी येथे ‘लोकसेवा सांस्कृतिक सेवा मंडळ’, ओंकार हॉस्पिटल, समता फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख मा मंगेश चिवटे यांनी उपस्थित राहून शिबिराचे उद्घाटन केले.
या आरोग्य शिबीरात मोफत ईसीजी, रक्तदाब तपासणी, कान नाक घास तसेच मोफत डोळे तपासणी करण्यात आली व गरजूंना मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आले, निःशुल्क नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू लेन्स शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क तपासणी या आणि योग्य सल्ला आणि मार्गदर्शन केले तसेच मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची निशुल्क शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला, गरोदर माता यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख जितेंद्र सातव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सोशल मीडिया प्रमुख भूषण सुर्वे तसेच लोकसेवा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष व्यंकट जाधव, अविनाश लोणे, मोहन सलगर, शंकर निकम, अशोक जाधव, दिनकर जाधव, मुरलीधर दळवी, बाळासाहेब बराटे, धनाजी जाधव, हेमंत पाटील आदी मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होते. यावेळी एच व्ही देेेसाई नेत्र रुग्णालय, ओंकार हॉस्पिटल, ससून रुग्णालय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…