कला , साहित्य व सांस्कृतिक समितीचे सदस्य म्हणून नगरसदस्य तुषार रघुनाथ हिंगे यांची नियुक्ती

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. २० जानेवारी २०२१ ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सदस्य म्हणून नगरसदस्य तुषार रघुनाथ हिंगे यांची नियुक्ती आज महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली.  सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या.

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्य झालेल्या केशव घोळवे यांनी या समिती सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने एक जागा रिकामी झाली होती.  या रिकाम्या जागेवर तुषार हिंगे यांची नियुक्ती झाली आहे.  या नियुक्तीबद्दल हिंगे यांचे महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये महापौरांच्या हस्ते पुस्तक देऊन अभिनंदन करण्यात आले.  महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या सत्कारप्रसंगी  आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, नगरसचिव उल्हास जगताप आदी उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago