महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक १० जुलै २०२३:-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
मर्यादित कालावधीकरीता असणा-या योजनेमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय १ ली ते वय वर्ष १८ पर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती स्वरुपात दरमहा २ हजार याप्रमाणे वार्षिक २४ हजार रुपये, तर ५ वी ते १८ वर्षे वयोगटातील दिव्यांगामुळे शाळेत जाऊ न शकणा-या दिव्यांग मुलांमुलींना दरमहा ३ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना १२ वी नंतरचे वैद्यकीय प्रथम वर्षासाठी एम. बी. बी. एस / बी. ए. एम. एस / बी. एच. एम. एस / बी. डी. एस / बी. यु. एम. एस / बी. आर्किटेक / बी. पी. टी. एच / बी. फार्म / बी. व्ही. एस. सी आणि अभियांत्रिकी पदवी यासारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रथम वर्षासाठी एकदाच जास्तीत जास्त १ लाख रुपये अर्थसहाय्य तसेच महापालिका हद्दीत वास्तव्यात असलेल्या दिव्यांग व्यक्तींना महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत आयटीआय मार्फत एम. के. सी. एल अंतर्गत येणारे एम.एस. सी. आय. टी / डी. टी. पी / टॅली व के.एल. आय. सी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मानव हिताच्या दृष्टीकोनातून काम करणा-या मतीमंद, अंध, कुष्ठरोगी, मुकबधीर, वृद्धाश्रम, अनाथालय अशा संस्थांना जास्तीत जास्त २ लाख ९९ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच वर्षभर खुल्या असणाऱ्या योजनांमध्ये दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी बॅंकेकडील मंजूर कर्जाच्या ५०% अथवा जास्तीत जास्त १ लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
पंडीत दीनदयाल उपाध्याय – दिव्यांग कल्याणकारी योजनेतर्गत प्रती महिना २ हजार पाचशे रुपये, संत गाडगे महाराज – दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाहासाठी १ लाख रुपये एकदाच तर दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास अशा नवविवाहित जोडप्यास २ लाख रुपये एकदाच अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
वरील नमूद केलेल्या सर्व घटक योजनांचे अर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवरून मुखपृष्ठावरील ‘’समाज विकास विभाग योजना’’ या पर्यायावरून दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…