Google Ad
Uncategorized

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; सुसाईड नोट लिहून हिंगोलीत तरुणाची आत्महत्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ ऑक्टोबर) : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) टोकाचे पाउल उचलत आत्महत्यांच्या (Suicide) घटना समोर येत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी गेला असून, सुसाईड नोट लिहून हिंगोलीत तरुणाने आत्महत्या केली आहे.

तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने ‘मी मराठा आरक्षणासाठी जीव देत असल्याचे’ सुसाईड नोट लिहून ठेवले आहे. कृष्णा कल्याणकर (वय 25 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

Google Ad

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी हिंगोलीच्या देवजना गावामध्ये गेला आहे. आज सकाळी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्णा कल्याणकर या पंचवीस वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या युवकाकडून एक सुसाईड नोट सुद्धा पोलिसांना मिळाली असून, यामध्ये मराठा आरक्षणामुळे आत्महत्या करत असल्याचे मयत कृष्णा कल्याणकर या युवकाने लिहून ठेवले आहे. याबाबत माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तर, पोलिसांकडून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!