Google Ad
Uncategorized

देहू ते पंढरपूर वारीमध्ये ‘आनंदडोह – आनंदवारी’ संपन्न होणार!

देहू ते पंढरपूर वारीमध्ये

‘आनंदडोह – आनंदवारी’ संपन्न होणार!

Google Ad

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ जून) :देहूहून पंढरपूरला जाणाऱ्या वारी सोबत यंदा जगद्गुरू संत तुकारामांचे जीवन एकपात्री प्रयोगातून सादर करण्याचा अनोखा ‘आनंदडोह – आनंदवारी’ उपक्रम यंदा आयोजित करण्यात आला आहे. अभिनेते योगेश सोमण यांच्या सुमारे पावणेदोन तासांच्या या कार्यक्रमाचे आयोजन संवाद – पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीयसेवा योजनेचे विद्यार्थी आणि राज्यच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने संपन्न होत आहे.

याकामी निकिता मोघेहरी चिकणे आणि मंदार चिकणे यांचा सहभाग लाभत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दि. ९ जून रोजी सायं. ५.०० वाजता श्री क्षेत्र देहू येथील सुजन फाउंडेशनचे अभंग इंग्लिश मीडियम स्कूलमधील गाथा मंदिर येथे भव्यतेने संपन्न होईल. याचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील करतील. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. याप्रसंगी देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरेपालखी प्रमुख सर्व श्री संजय महाराज मोरेभानुदास महाराज मोरे आणि अनिल महाराज  मोरेनिमंत्रक प्राध्यापक विकास कंदराष्ट्रसेवा योजनेचे सल्लागार समिती सदस्य राजेश पांडेराष्ट्रसेवा योजनेचे संचालक  प्राध्यापक डॉ. सदानंद भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती संयोजक संवाद – पुणेचे अध्यक्ष सुनिल महाजन आणि राष्ट्रसेवा योजनेचे सल्लागार राजेश पांडे यांनी दिली. 

या ‘आनंदडोह – आनंदवारी’ कार्यक्रमात अभिनेते योगेश सोमण संत तुकारामांच्या वेशभूषेत संत तुकारामांच्या जिवनाचे अर्थ विविध प्रसंगाचे निरुपण करून सादर करतील.  अतिशय ओघवत्या भाषेत सादर होणारा हा कार्यक्रम पावणेदोन तासांचा आहे.

देहूपुणेलोणीसासवड, वरवंडइंदापूरअकलूजवेळापूरवाडी पुरवली आणि पंढरपूर या पालखीच्या मुक्कामाच्या गावांमध्ये तेथील महाविद्यालयांच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न होईल. यासाठीचे स्थानिक व्यवस्थापन या सर्व गावांमधील महाविद्यालयाचे प्राचार्य करणार आहेत. या ‘आनंदडोह’ कार्यक्रमात संत तुकारामांचे विचार अतिशय ओघवत्या भाषेत मांडले आहेत. या बरोबरच त्यांच्या संपूर्ण जीवनाचा वेधही अत्यंत प्रासादिक भाषेत घेण्यात आला आहे. याचे लेखन श्री. योगेश्वरदिग्दर्शन श्री. आनंद स्वरूपसंगीत केदार दिवेकररंगमंच व्यवस्था धवल पाठकअक्षय पाटणकर आणि सादरकर्ते अभिनेते योगेश सोमण आहेत.  

या ‘आनंदडोह’ कार्यक्रमाच्या मार्गावरील ठिकठिकाणच्या गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे २०० महाविद्यालयीन विद्यार्थी व्यवस्थापनाची  धुरा सांभाळतील व तसेच संपूर्ण देहू ते पंढरपूर या वारी प्रवासात हे विद्यार्थी सोबत असतील. या अनोख्या कार्यक्रमाची माहिती देहू पासून पंढरपूरपर्यंतच्या मार्गावरील सर्व गावांमध्ये देण्यात आलेली असून वारकरी व प्रेक्षक या सर्वांना हा कार्यक्रम विनामुल्य असेल. गावोगावी या कार्यक्रमाची उत्सुकता वारकरी व गावकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!