Google Ad
Uncategorized

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने देहुरोड येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये २५० झाडांचे वृक्षारोपण

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०८ जून) : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने देहुरोड (Dehuroad) येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले. कंपनीतील कामगार संघटना व पतसंस्थेच्या पदाधिकारी यांच्यासाठी 5 जून रोजी पर्यावरण संवर्धन – काळाची गरज या विषयावर धनंजय शेडबाळे यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले.

ऑर्डनन्स फॅक्टरीच्या आवारात वरिष्ठ महाव्यवस्थापक संजीव गुप्ता, सहाय्यक व्यवस्थापक एन.पी.नाईक, उद्योजक विजयशेठ जगताप, हभप शिवाजी महाराज मोरे, डॉ. रमेश बन्सल, निसर्गमित्र भास्कर रिकामे, गौरव मालविय यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कदंब, बेल, सागवान, आपटा, बकुळ आदि स्थानिक प्रजातींची 250 झाडे यावेळी लावण्यात आली.

Google Ad

“केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या सर्व झाडांची निगा राखणे व काळजी घेणे आवश्यक असून त्यासाठी ऑर्डनन्स फॅक्टरीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी पुर्ण क्षमतेने प्रयत्न करतील” अशी खात्री संजीव गुप्ता यांनी दिली. पुढे ते म्हणाले “स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने परिसरातील मोकळ्या जागेवर देखील नजीकच्या काळात स्थानिक जातींची झाडे लावून निसर्ग संवर्धनासाठी योगदान दिले जाईल.”

यावेळी कार्यकारी व्यवस्थापक गौरव मालविय, विजय सातपुते, भाऊसाहेब जाधव, विनोद जैन, अर्चना राऊत यांचेसह ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार संघटनेचे व पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी , स्वातंत्र्यवीर सावरकर (Dehuroad) मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पर्यावरण विषयक सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी गौरव मालविय व डॉ. रमेश बन्सल यांनी विशेष मेहनत घेतली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement