Google Ad
Uncategorized

भाजप आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या दौंडच्या भीमा साखर कारखान्यामध्ये 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मार्च) : पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात 500 कोटी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार म्हणजे ‘मनी लॉन्ड्रिंग’ केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भाजप आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या दौंडच्या भीमा साखर कारखान्यामध्ये 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून ईडी- सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Google Ad

कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे व तपास यंत्रणांच्या घाडी पडत आहेत. परंतु दौडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवसार यापेक्षाही भयंकर असून या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर गंभीर आहे, असे राऊत यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

पत्रामध्ये राऊत पुढे म्हणतात की, भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सुत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहे. पण किरीट सोमय्या त्या भ्रष्टाराचावर मूग गिळून आहेत.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!