Categories: Uncategorized

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर मोठ्या उत्साहात अखंड गाथा पारायण सोहळ्याला सुरुवात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ फेब्रुवारी) :श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी व जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस वसंतपंचमीनिमित्त गेली ७१ वर्षांपासून सुरु असणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली.

मावळचे माजी आमदार स्व. दिगंबरदादा भेगडे याचे चिरंजीव मनोहर भेगडे व परिवाराच्यावतीने बुधवारी पहाटे ५ वाजता परंपरेप्रमाणे पांडुरंगाला अभिषेक व महापूजा संपन्न झाली. यावेळी माजी आमदार विलास लांडे, वाकुळणी येथील संतपीठाचे प्रमुख व गाथामूर्ती ह.भ.प. नाना महाराज तावरे, उद्योजक विजय जगताप, संत साहित्याचे अभ्यासक कीर्तनकार ह.भ.प. पंकज महाराज गावडे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, कासारवाडी येथील दत्त आश्रमाचे मठाधिपती शिवानंद स्वामी महाराज, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, पिं.चिं.चे माजी नगरसेवक आप्पा बागल, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद, ह.भ.प. जगन्नाथ नाटक पाटील, जोपाशेठ पवार, ह.भ.प. ढमाले मामा व सर्व विश्वस्त, भंडारा डोंगर परिसरातील इंदोरी, सुदवडी, जांबवडे, सुदम्ब्रे आदी गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या गाथा पारायण सोहळ्यासाठी मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागातून, तसेच मध्यप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून आलेल्या भाविकांचे स्वागत श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद यांनी केले.

प्रास्ताविक करताना बाळासाहेब काशीद म्हणाले, की भंडारा डोंगरावरील भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी वारकरी संप्रदायातील सर्व थोर कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी, तसेच तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणारे, समाजजीवनात कार्यरत असणारे सर्वजण मदत करीत असून, मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. आजपर्यंत मंदिराचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. सर्वांच्या सहकार्याने संत तुकाराम महाराजच हे पवित्र मंदिर निर्माणाचे कार्य पूर्णत्वास नेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

माजी आमदार विलास लांडे व ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांनी या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. तसेच ह.भ.प. नाना महाराज तावरे यांनी आशीर्वाद दिले.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago